ETV Bharat / city

मुंबईतील ४५ प्रभागांची पुनर्रचना संशयास्पद, सुधारणा करण्याची काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी

मुंबईतील ४५ प्रभागांची पुनर्रचना संशयास्पद आहे. त्यामुळे त्यात सुधारणा करण्याची मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

ravi raja
रवी राजा
author img

By

Published : Jun 1, 2021, 8:10 PM IST

मुंबई - मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. त्यावेळी राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा सरकारने प्रभाग पुनर्रचना आपल्या सोयीची केली. यामुळे भाजपच्या ४० ते ५० जागा वाढल्या. या जागांपैकी ४५ प्रभागांची पुनर्रचना संशयास्पद आहे. त्यामुळे या प्रभागांच्या भौगोलिक पुनर्रचनेत सुधारणा करण्यात यावी. येत्या २०२२ च्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी यात सुधारणा करण्याची मागणी काँग्रेसचे पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

राजकीय वाद -

मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होत आहे. या निवडणुकीच्या प्रशासकीय तयारीला लागण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने पालिकेला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. निवडणुकीला ९ महिने शिल्लक असताना आतापासूनच राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यात प्रभाग पुनर्रचनेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय वाद सुरु झाला आहे. यात आता काँग्रेसनेही उडी घेतली आहे. काँग्रेसचे पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी प्रभाग पुनर्रचनेवरून थेट राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यू. पी. एस. मदान यांना पत्र पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - जळगाव : देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यात शेतकऱ्याचा विष घेत आत्महत्येचा प्रयत्न

चूक दुरुस्त करावी -

सन २०१७ मध्ये भाजपचे सरकार होते. यावेळी सरकारने पालिकेच्या २२७ जागांची पुनर्रचना करताना आपल्या पदाचा गैरवापर करून आपल्या सोयीप्रमाणे जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने पुनर्रचना केली. यात आपल्या पक्षाला कसा फायदा होईल, याकडे पाहिले. त्यामुळे भाजपला ४० ते ५० जागा अधिक मिळाल्या. ही बाब नैसर्गिक न्याय तत्वाच्या विरूद्ध होती. तेव्हा काही नागरिकांनी हरकती आणि सूचनांमार्फत या पुनर्रचनेला विरोध करूनही त्यांना न्याय देण्यात आला नाही. हे प्रकरण अतिशय गंभीर असून सामान्य नागरिकांवर अन्याय करणारे आहे. त्यामुळे भाजपने आपल्या राजकीय फायद्यासाठी केलेल्या ४५ प्रभागांच्या पुनर्रचनेत सुधारणा करून ही चूक दुरूस्ती करावी, असे रवी राजा यांनी या पत्रात नमूद केले आहे.

हेही वाचा - 'कोरोनाचे संकट ओसरल्यानंतर राज्यातील सत्तांतराचे पाहू'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.