ETV Bharat / city

Congress Agitation In Mumbai : मुलुंडमध्ये काँग्रेस-भाजपा कार्यकर्ते आमनेसामने - नरेंद्र मोदी यांच्याविरोधात काँग्रेसचे आंदोलन

भाजपाचे खासदार मनोज कोटक यांच्या कार्यालयासमोर मुंबई काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात ( Congress Agitation manoj Kotak house front ) आले. काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत होते. पोलिसांनी यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

Congress Agitation
Congress Agitation
author img

By

Published : Feb 21, 2022, 1:34 PM IST

Updated : Feb 21, 2022, 4:37 PM IST

मुंबई - महाराष्ट्रातून आलेल्या मजुरांमुळे देशात कोरोना पसरला, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केले होते. या वक्तव्याच्या माफीसाठी काँग्रेसकडून 'माफी मांगो' आंदोलन करण्यात येत आहे. आज ( सोमवार ) भाजपा खासदार मनोज कोटक यांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात ( Congress Agitation manoj Kotak house front ) आले.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसतर्फे भाजपाचे खासदार मनोज कोटक यांच्या मुलुंड येथील कार्यालयासमोर आंदोलन केले गेले. त्यावेळी आंदोलनाच्या विरोधात भाजप कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात मनोज कोटक यांच्या कार्यालयाबाहेर जमा झाले होते. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते यावेळी आक्रमक झालेले पाहायला मिळाले. ही सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.

व्हिडिओ

तर, यादरम्यान मनोज कोटक यांच्या कार्यालयावर जाण्याचा प्रयत्न केल्याने काँग्रेस कार्यकर्ते आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आम्हालाही गुंडगिरी करता येते....

भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, शिवरायांच्या विचारांचा अपमान केला असून, भाजपाने त्यांना पाठिंबा दिला आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. मोदींनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे, त्याबद्दल त्यांनी माफी मागितलीच पाहिजे ही आमची मागणी आहे. काँग्रेस अहिंसावादी आहे, हिंसावादी नाही. आम्हालाही गुंडगिरी करता येते पण ही आमची संस्कृती नाही. परंतु, भाजपाने आपला खरा चेहरा मुंबई आणि महाराष्ट्राला दाखवला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिली होती.

हेही वाचा - ED Raids in Mumbai : मुंबईत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीची छापेमारी

Last Updated : Feb 21, 2022, 4:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.