ETV Bharat / city

Police Colonies Redevelopment : पोलीस वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत सर्वंकष धोरण तयार - मुख्यमंत्री

author img

By

Published : Jul 27, 2022, 3:58 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde )यांनी बोरिवलीतील धोकादायक पोलीस वसाहतीची पाहणी केली. दरम्यान, मुंबई आणि उपनगरातील धोकादायक झालेल्या पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासाबाबत ( Redevelopment Police Colonies ) लवकरच सर्वंकष धोरण तयार करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. पोलीस कुटूंबियांसोबत देखील त्यांनी संवाद साधला.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई - बोरिवलीतील धोकादायक पोलीस वसाहतीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde )यांनी पाहणी केली. दरम्यान, मुंबई आणि उपनगरातील धोकादायक झालेल्या पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासाबाबत ( Redevelopment Police Colonies ) लवकरच सर्वंकष धोरण तयार करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे, आमदार मनीषा चौधरी, आमदार सुनील राणे, आमदार रवींद्र फाटक, अतिरिक्त पोलीस महासंचालक अर्चना त्यागी आणि संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
लवकर घरांचा प्रश्न सोडवणार - मुंबईतील अनेक पोलीस वसाहतींची परिस्थिती अत्यंत दयनीय असून त्यात राहणारे पोलिसांचे कुटूंबीय अडचणीत आले ( Police Families suffering ) असून जीव मुठीत धरून जगत आहेत. ही परिस्थिती मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाऊन पाहिली तसेच पोलीस कुटूंबियांशी संवाद साधून त्यांची अडचण जाणून घेतली. यावेळी पोलीस वसाहतींची माहिती घेतल्यावर त्यात राहणाऱ्या पोलीस कुटूंबियांसोबत देखील त्यांनी संवाद साधला ( interact with police families ). यावेळी लवकरात लवकर तुमच्या घरांचा प्रश्न सोडवला जाईल तसेच पोलीसांच्या घरांची संख्या वाढवण्याचा देखील प्रयत्न केला जाईल असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्रीपदी बसल्यानंतर पुन्हा एकदा लक्ष घालू - पोलीस वसाहतींचा प्रश्न प्रदीर्घ काळ प्रलंबित असून त्यावर तोडगा काढण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy CM Devendra Fadnavis ) यांच्यासोबत देखील आपली चर्चा झालेली असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. मागे याबाबत धोरण निश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदी बसल्यानंतर या प्रश्नात पुन्हा एकदा लक्ष घालून हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येईल. यासाठी लवकरच गृह विभागातील सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांसोबत या विषयावर बैठक घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा - Uddhav Thackeray : एकनाथ शिंदें यांनी वाईट पद्धतीने मुख्यमंत्री पद मिळविले- उद्धव ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.