मुंबई हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga)या मोहिमेअंतर्गत मुंबई महापालिकेतर्फे तिरंगा वितरण सुरू आहे. तिरंगा वितरण अंतिम टप्प्यात असतांना नागरिकांकडून ध्वजा बरोबर काठीची ही मागणी होत आहे. मात्र महापालिका तिरंगा सोबत काठी देऊ शकत नाही. तेव्हा लोकप्रतिनिधींनी लोक सहभागातून काठ्या द्याव्यात, (municipal corporation over the stick of the flag) असे महापालिकेचे म्हणणे आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संबंधित सूचना सर्व महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. मुंबई महानगरपालिकेने ही शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार घरोघरी तिरंगा वितरण सुरू केले. तिरंगा वितरण आता अंतिम टप्प्यात आले असून; 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान ही मोहीम राबवली जाणार आहे.
मुंबईत कशी होणार अंमलबजावणी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत असून, महापालिका प्रशासनातर्फे मुंबई पन्नास लाख ध्वज उभारले जाणार आहे. यापैकी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 35 लाख देण्यात येत आहे. विविध कार्यालय आणि अन्य संस्थांच्या माध्यमातून मिळून 50 लाख उभारले जातील, असे पालिकेचे म्हणणे आहे.
नागरिकांना हवी ध्वजासोबत काठी प्रशासनातर्फे वितरण सुरू आहे. अनेक रहिवासी इमारती आणि झोपडपट्ट्यांमध्ये ध्वजवितरण करण्यात येत असून, नागरिकांकडून आता ध्वजासाठी काठीची मागणी होत आहे. महापालिकेने ध्वज दिला आहे. मात्र तो लावायचा कसा? त्यासाठी काठी कुठून आणायची? हा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे. यासंदर्भात नागरिकांनी महानगरपालिकेकडे काठ्याची मागणी केली आहे. मात्र, महानगरपालिका काठ्या पुरवू शकणार नाही. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपापल्या निधीतून, तसेच शक्य असेल तर लोकसहभागातून काठी द्यावी असे आवाहन, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा यांनी केले आहे. काही सामाजिक संस्थांनी स्वतः पुढे येऊन याबाबतीत ध्वज वितरण केले आहे. तर काही संस्था काठ्या आणि अन्य साहित्य पूर्वत असल्याचेही त्यांनी सांगितले जात आहे.
मुंबईत मोहीम यशस्वी होईल दरम्यान 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान मुंबईत 'हर घर तिरंगा' या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळेल. तसेच आपल्या राष्ट्रध्वजा विषयी नागरिकांच्या मनात आदर असायला हवा. त्यासाठी ध्वज आचारसंहिता शिथिल करण्यात आली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा Har Ghar Tiranga साताऱ्यातील लोणंद शहरात निघाली तब्बल 321 फूट लांबीची तिरंगा रॅली