ETV Bharat / city

आदित्य ठाकरे यांचा फोटो व्हॉट्सअप डिस्प्ले ठेवून फसवणूक, अज्ञाताविरोधात पोलिसात तक्रार दाखल

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा फोटो व्हॉट्सअप डिस्प्ले पिक्चर म्हणून टाकून लोकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दादर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयपीसीच्या कलम ४१७, ४१९, ५११, ६६ सी, ६६ डी अन्वये तक्रार दाखल करण्यात आली आहे. Aaditya Thackeray as Whatsapp DP

आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे
author img

By

Published : Aug 28, 2022, 12:41 PM IST

Updated : Aug 28, 2022, 1:14 PM IST

मुंबई शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा फोटो व्हॉट्सअप डिस्प्ले पिक्चर म्हणून टाकून लोकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दादर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयपीसीच्या कलम ४१७, ४१९, ५११, ६६ सी, ६६ डी अन्वये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास दादर पोलीस करत आहेत.

व्हॉट्सअपला डीपी लावून फसविण्याचे गुन्हे वाढले आहेत. नुकतेच तेलंगणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश सतीश चंद्रशर्मा यांचा फोटो व्हॉट्सअॅप डीपी म्हणून वापरून चोरट्यांनी सायबर फसवणूक केली आहे. तेलंगणा उच्च न्यायालयात न्यायमूर्ती सतीश चंद्र यांचा फोटो व्हॉट्सअॅप डीपी ( Fake Whatsapp DP Fraud ) म्हणून वापरून सायबर घोटाळेबाजांनी दोन लाखांची फसवणूक ( fraud with justice sathish chandra whatsapp DP ) केली.

व्हाट्सऍपला लावला फोटो : तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत असलेले दिल्लीचे विद्यमान मुख्य न्यायाधीश सतीश चंद्रा यांचा एक फोटो चोरटयांनी प्रोफाईलला लावला. अलीकडेच चंद्रा यांची दिल्ली उच्च न्यायालयात बदली झाली. सायबर गुन्हेगारांनी तेलंगणा उच्च न्यायालयात सब-रजिस्ट्रार म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमन्नारायण यांना व्हॉट्सअॅप डीपी म्हणून सीजेचा फोटो वापरून संदेश पाठवला. मी एका खास मीटिंगमध्ये आहे. मला तातडीने पैशांची गरज आहे. पण माझी सर्व बँक कार्ड ब्लॉक झाली आहेत. मी तुम्हाला Amazon लिंक पाठवतो. त्यावर क्लिक करा आणि 2 लाख रुपयांची गिफ्ट कार्ड पाठवा" असे त्यांना सांगितले.

मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचा फोटो व्हॉटस् अ‍ॅपला डीपी Mumbai CP Vivek Fansalkar Whats App DP ठेवून गिफ्टची मागणी करणारे मेसेजेस सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने fake message on name of mumbai cp एकच खळबळ माजली. यानंतर मुंबई पोलिसांनी नागरिकांना या मेसेजला प्रतिसाद न देण्याचे आवाहन Request don't respond to cp messages केले आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांचे प्रवक्ते बाळसिंग राजपूत यांनी केली. Mumbai cp demand gift from whats app आरोपीने फणसळकर यांच्या संपर्क यादीतील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संदेश पाठवून त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. फणसळकर यांचे छायाचित्र भामट्यांनी व्हॉट्सअॅप प्रोफाईल म्हणून ठेवले. मात्र, कोणीही या फसवणूकीला बळी पडले नाही.

हेही वाचा सोनाली फोगट खून प्रकरणात आरोपींना न्यायालयात करण्यात येणार हजर, सीबीआयकडे प्रकरण सोपविण्याची गोवा सरकारची तयारी

Last Updated : Aug 28, 2022, 1:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.