ETV Bharat / city

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याबाबत मलबार हिल पोलीस ठाण्यात भाजपने तक्रार दिली आहे. आधीच बंडखोरीने वैतागलेल्या मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल झाल्याने त्यांची आणखी डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Jun 23, 2022, 8:40 AM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याबाबत मलबार हिल पोलीस ठाण्यात भाजपने तक्रार दिली आहे. आधीच बंडखोरीने वैतागलेल्या मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल झाल्याने त्यांची आणखी डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर राज्यात निर्माण झालेल्या राजकीय घडामोडीमुळे ( Maharashtra Political Crisis ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासकीय वर्षा निवासस्थानसोडून मातोश्रीवर रवाना झाले. रस्त्यावरही हजारो शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करत उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी उतरले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी दरम्यान, गाड्यांचा ताफा थांबवून शिवसैनिकांना भेटले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे सांगण्यात आले. फेसबूक लाइव्हमधून जनतेशी संवाद साधतानाही मुख्यमंत्र्यांनी आपल्याला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर लगेचच वर्षा निवास्थान सोडल्याने हजारो शिवसैनिकांनी वर्षावर गर्दी केली. या सर्वांना मुख्यमंत्री भेटले, असा आरोप भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी करत ऑनलाइन पद्धतीने मलबार हिल पोलीस ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

कोरोना नियमांनुसार, एखाद्या व्यक्तीला करोनाची लागण झाली, तर त्याला कुणालाही भेटता येत नाही. रुग्णाला गृहविलगीकरणात राहावे लागते, असे असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वांना भेटत असल्याचे बातम्यांमध्ये दिसल्याने बग्गा यांनी ही तक्रार केल्याचे म्हटले.

हेही वाचा - Nitin Deshmukh Signature : शिवसेनेचे आमदार देशमुख म्हणतात, ती सही माझी नाही, व्हिडिओत मात्र सही करताना दिसले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.