मुंबई - कोरोनाची तीव्रता हळूहळू कमी होत असताना आता जनजीवन पूर्वपदाला येताना दिसत आहे. गेल्या दोन वर्षापासून ऑनलाईन होणारे महाविद्यालयीन शिक्षण आता विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे घेता येणार आहे. येत्या 20 ऑक्टोंबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरू होणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. यासंबंधित नियमावली तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कोरोना रूग्ण कमी असतील तेथे स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून ५० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित राहू शकतात. ज्यांचे दोन डोस झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांनाच कॉलेजात प्रवेश द्यावा. विद्यार्थ्यांचे डोस पूर्ण झाले नसतील, तेथील कॉलेजांनी पुढाकार घेऊन लसीकरणाचे कॅम्प लावावेत. जे विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार नाहीत, त्यांना ऑनलाईन शिक्षणाची सोय कॉलेज, विद्यापीठांनी उपलब्ध करून द्यावे. टप्प्याटप्याने हॉस्टेल सुरू करण्यास परवानगी दिली आहे. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे १०० टक्के लसीकरण करण्याचे प्रयत्न कॉलेज, विद्यापीठाने करायचे आहेत. सेट नेट न झालेल्या ४१३३ प्राध्यापकांची पेन्शन थांबवली होती. त्यांना पेन्शन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - टीम इंडियाला मिळाली नवी जर्सी, स्टायलिश लुकसह रंगात आहे जरा बदल