ETV Bharat / city

Coastal Road : कोस्टल रोडचे काम ५० टक्के पूर्ण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला आढावा

author img

By

Published : Apr 13, 2022, 7:37 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ( CM Uddhav Thackeray ) अत्यंत महत्वाकांक्षी असलेल्या कोस्टल रोडचे काम ५० टक्के पूर्ण झाले ( Coastal Road work 50 percent complete ) आहे. या कामाचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ( CM Thackeray Reviews Coastal Road Work ) घेतला.

कोस्टल रोडचे काम ५० टक्के पूर्ण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला आढावा

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांच्या संकल्पनेतील महत्वाकांक्षी असलेल्या कोस्टल रोडचे काम सध्या ५० टक्के पूर्ण झाले ( Coastal Road work 50 percent complete ) असून, २०२३ पर्यंत संपूर्ण काम पूर्ण होईल, असे ग्वाही मनपा आयुक्त इक्बाल चहल ( Municipal Commissioner Iqbalsingh Chahal ) यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोस्टल रोडचा आढावा ( CM Thackeray Reviews Coastal Road Work ) घेतला. दरम्यान, राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन त्याचा अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

अधिकाऱ्यांची घेतली बैठक : आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्रालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मुख्यसचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री सचिवालयाचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक इक्बालसिंह चहल (दूरदृष्यप्रणाली द्वारे) यांच्यासह इतर मंत्रालयीन अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना : मुख्यमंत्र्यांनी संकल्प कक्षातून आढावा घेण्यात येत असलेल्या योजनांची तसेच कामांची माहिती यावेळी घेतली. यावर्षी शासनाने अर्थसंकल्पाच्या माध्यमातून विकासाची पंचसूत्री जाहीर केली आहे. यातील महत्वाच्या विषयांचा, कामांचा पाठपुरावाही संकल्प कक्षामार्फत घेतला जावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

दर आठवड्याला आढावा : महाराष्ट्राच्या दृष्टीने अनेक प्रकल्प महत्वाचे आहेत. यापैकी काही योजना तसेच प्रकल्पांचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. काही कामं प्रगतीपथावर आहेत. या प्रकल्पांसह आपण संकल्पित केलेले विविध प्रकल्प वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावेत यासाठी त्यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. योजना तसेच प्रकल्पांचा आपण स्वत: दर आठवड्याला आढावा घेणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आज सागरी किनारा मार्गाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. दरम्यान, सागरी किनारा मार्गाचे ५२ टक्के भौतिक काम पूर्ण झाले आहे. निश्चित केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे काम सुरु आहे. हा प्रकल्प नियोजित वेळेत म्हणजे नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती चहल यांनी यावेळी दिली.

पाठपुरावा करण्याचे निर्देश : अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेल्या टेलिमेडिसीन सुविधेमध्ये माहिती तंत्रज्ञान विभागाचे काम महत्वपूर्ण असल्याचेही ते म्हणाले. राज्य शासनाच्या आतापर्यंतच्या तीनही अर्थसंकल्पामध्ये घोषित केलेल्या योजना तसेच प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा नियमित आढावा घेऊन कोणत्या योजना पूर्ण झाल्या, कोणत्या मागे राहिल्या आहेत याचा पाठपुरावा करण्याचे निर्देश ही त्यांनी यावेळी दिले.

हेही वाचा : कोरोनानंतर मुख्यमंत्री अखेर मंत्रालयात; कर्मचाऱ्यांना दिल्या 'या' सूचना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.