ETV Bharat / city

CNG Price Hike : सीएनजी दरवाढीविरोधात रिक्षा चालक आक्रमक; आंदोलनाचा इशारा - मुंबईत सीएनजी दरात वाढ

मुंबईत सीएनजीच्या दरात तब्बल चार रुपयांची दरवाढ करण्याची घोषणा ( Mumbai CNG Gas Price Hike ) केली आहे. त्यामुळे सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा व टॅक्सींना अनुदानित दराने गॅस पुरवठा करवा. अन्यथा आम्ही आंदोलन करु, असा इशारा मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियनने दिला ( Riksha Driver Warn On Strike ) आहे.

CNG
CNG
author img

By

Published : Apr 29, 2022, 10:56 PM IST

मुंबई - महानगर गॅस लिमिटेडने मुंबईत सीएनजीच्या दरात तब्बल चार रुपयांची दरवाढ करण्याची घोषणा ( Mumbai CNG Gas Price Hike ) केली आहे. त्यामुळे सीएनजी दर 72 रुपयांवरून 76 रुपयांवर पोहोचले आहे. यावेळी पीएनजी दरात मात्र कोणताही बदल केला नसल्याचे महानगर गॅस लिमिटेडने स्पष्ट केलेले आहे. दरम्यान, सीएनजी दरवाढीची सर्वाधिक झळ रिक्षा व टॅक्सी चालकांना बसत आहे. त्यामुळे अनुदानित दराने सीएनजी पुरावावा, अशी मागणी मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियनने केली ( Riksha Driver Warn On Strike ) आहे.

महानगर गॅसने एप्रिल महिन्यात सलग तिसऱ्यांदा सीएनजीच्या दरात वाढ करत गॅस 30 टक्‍क्‍यांनी महाग केलेले आहे. या दरवाढीनंतर 72 रुपये प्रतिकिलो असलेला सीएनजी आता 78 रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करावा लागत आहे. अनेक खाजगी वाहन चालकांनी या दरवाढीनंतर वाहने जागीच उभी ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. याउलट रिक्षा व टॅक्सी चालकांना सीएनजीशिवाय पर्याय नसून मर्यादित भाड्यामध्ये प्रवासी वाहतूक करावी लागत आहे.

एकीकडे प्रवासी भाडे स्थिर असताना या महिन्यात सीएनजीचे दर 30 टक्क्यांनी भडकल्याने रिक्षा व टॅक्सी चालकांना नुकसान सहन करावे लागत आहे. परिणामी सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा व टॅक्सींना अनुदानित दराने गॅस पुरवठा करण्याची मागणी युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी एमजीएलकडे केली आहे. अन्यथा आम्ही आंदोलन करू, असा इशारा सुद्धा शशांक राव यांच्याकडून देण्यात आलेला आहे.

हेही वाचा - Ajit Pawar Meet Nitin Gadkari : अजित पवार नितीन गडकरींच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.