ETV Bharat / city

वाद घालणे अन् भिंती रंगवण्याचे काम आम्हाला राहिले नाही; मुख्यमंत्री ठाकरेंचा फडणवीसांना टोला - shivsena

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राज्यातील 2 लाखावर ज्या शेतकऱ्यांचे कर्ज आहे. त्यांच्यासाठी आम्ही वेगळी योजना करतोय. जो शब्द दिलांय तो पूर्ण करतोय. तर शेतकऱ्यांच्या कर्जाची दीड लाख रुपयांची मर्यादा आम्ही 2 लाख रुपयांपर्यंत केली आहे. त्यातही आम्ही अटी आणि शर्थी काढून टाकल्या असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Dec 30, 2019, 7:40 PM IST

Updated : Dec 30, 2019, 9:02 PM IST

मुंबई - आम्ही जे करतो ते रोख ठोक करतो, वाद घालणे आणि भिंती रंगवण्याचे काम आम्हाला राहिले नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते फडणवीस यांना लगावला आहे. वर्षा बंगल्यातील भिंतीवर काढण्यात आलेल्या उद्धव ठाकरेंच्या विरोधातील लिखाणावर देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता शिवसेनेवर राजकारण केल्याची टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री ठाकरेंचा फडणवीसांना टोला

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राज्यातील 2 लाखावर ज्या शेतकऱ्यांच कर्ज आहे. त्यांच्यासाठी आम्ही वेगळी योजना करतोय. जो शब्द दिलांय तो पूर्ण करतोय. तर शेतकऱ्यांच्या कर्जाची दीड लाख रुपयांची मर्यादा आम्ही 2 लाख रुपयांपर्यंत केली आहे. त्यातही आम्ही अटी आणि शर्थी काढून टाकल्या असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.

उद्या होणार खातेवाटप

महाविकास आघाडीने खाते वाटप एकमेकांच्या समजुतीने केली आहे. उद्या आम्ही ते जाहीर करू असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच राज्यपालांनी काही मंत्र्यांना हटकले, त्यावर ठाकरे म्हणाले, की राज्यपालांचे म्हणणे आहे की, जे नियमानुसार आहे त्याप्रमाणे व्हायला हवे. त्यामुळे त्यांनी शपथविधी वेळी काही मंत्र्यांना रोखले असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी राज्यपालांच्या वागण्यावर दिले.

मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्याने काही नेते नाराज आहेत. त्यावर बोलताना शिवसेनेत जे कोणी नाराज आहेत, त्यांच्याशी बोलणार असल्याचे ठाकरेंनी यावेळी सांगितले. तसेच सेनेने मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना स्थान दिले नसल्याच्या टीकेवर बोलताना ठाकरे म्हणाले, महिलांच्या बाबतीत आम्ही गंभीर नाही असे नाही. आम्ही महिला कायद्यासाठी आवाज उठवला असल्याचे स्पष्टीकरण दिले. यावेळी त्यांनी जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील दिल्या.

Intro:मुंबई - आम्ही जे करतो ते रोख ठोक करतो,
वाद घालणे आणि भिंती रंगवण्याचं काम आम्हाला राहीलं नाही असा टोला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते फडणवीस यांना लगावला.
वर्षा बंगल्यातील भिंतीवर काढण्यात आलेल्या उध्दव ठाकरेंच्या विरोधातील लिखाणावर देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता शिवसेनेवर राजकारण केल्याची टीका केली होती.
Body:राज्यातील 2 लाखावर ज्या शेतकऱ्यांच कर्ज आहे, त्यांच्यासाठी आम्ही वेगळी योजना करतोय. जो शब्द दिलांय तो पूर्ण करतोय. तर शेतकऱ्यांच्या कर्जाची दीड लाख रुपयांची मर्यादा आम्ही 2 लाख रुपयांपर्यंत केलीय.त्यातही आम्ही अटी आणि शर्थी काढून टाकले असल्याचे स्पष्टीकरण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर मुख्यमंत्र्यांनी केले.
* उद्या होणार खातेवाटप*
महाविकास आघाडीने खाते वाटप एकमेकांच्या समजूतीने केली आहे, उद्या आम्ही ते जाहीर करू असे उध्दव ठाकरे म्हणाले.
राज्यपालांनी काही मंत्र्यांना हटकलं त्यांचं म्हणनं आहे की जे नियमा नुसार आहे त्या प्रमाणे होऊ देत असे स्पष्टीकरण देखील त्यांनी शपथविधीवेळी राज्यपालांच्या वागण्यावर दिले.
शिवसेनेत जे कोणी नाराज आहेत, त्यांच्याशी बोलू असे देखील उध्दव ठाकरेंनी शिवसेनेच्या नाराजांवर म्हटले.
महिलांच्या बाबतीत आम्ही गंभीर नाही असं नाहीये. आम्ही महिला कायद्यासाठी आवाज उठवला. असे स्पष्टीकरण देखील ठाकरे यांनी सेनेने मंत्रिमंडळात महिलांना स्थान न देण्यात आल्यावर होणाऱ्या टीकेवर दिले.
जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

Conclusion:
Last Updated : Dec 30, 2019, 9:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.