ETV Bharat / city

CM Order to DGP : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका; मुख्यमंत्र्यांच्या पोलिसांना सूचना - मशिदीवरील भोंग्यांसाठी मनसेचा अल्टिमेटम

राज्यात कायदा व सुव्यवस्था (Law and Order in State) राखण्यासाठी पोलिसांनी कोणाच्याही (Maharashtra Police on Law and Order) आदेशाची वाट पाहू नये. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी लगेच अॅक्शन घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray Order to DGP) यांनी पोलीस महासंचालकांना दिल्या आहेत. मशिदीवरील भोंगे (Loudspeakers Controversy) उद्यापर्यंत उतरवण्याचा अल्टिमेटम राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

CM Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : May 3, 2022, 7:54 PM IST

मुंबई - राज्यात कायदा व सुव्यवस्था (Law and Order in State) राखण्यासाठी पोलिसांनी कोणाच्याही (Maharashtra Police on Law and Order) आदेशाची वाट पाहू नये. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी लगेच अॅक्शन घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray Order to DGP) यांनी पोलीस महासंचालकांना दिल्या आहेत. मशिदीवरील भोंगे (Loudspeakers Controversy) उद्यापर्यंत उतरवण्याचा अल्टिमेटम राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - Police Alert : राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा कट; गुप्तचर यंत्रणा अलर्ट

गृहमंत्री-मुख्यमंत्री बैठक - आज दुपारी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कायदा व सुव्यवस्थाबाबत बैठक झाली. या बैठकीनंतर त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्याशी फोनवरून चर्चा करत राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आदेशाची वाट पाहू नका, अशा सूचना दिल्या आहेत.

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 1 मे ला औरंगाबादमध्ये सभा घेतली होती. सभेसाठी पोलिसांनी दिलेल्या अटी व शर्तींचे उल्लंघन झाल्यामुळे राज ठाकरे यांच्याविरोधात औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यभरात पोलीस अलर्ट मोडवर आहेत. राज्यात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभागाकडून सर्वतोपरी तयारी केली असल्याचे पोलीस महासंचालकांनी सांगितले आहे.

हेही वाचा - Raj Thackeray : चिथावणीखोर भाषण भोवले.. राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, 'असे' आहे संपूर्ण प्रकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.