मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या पाचमध्ये स्थान पटकावलं ( Popular Chief Minister Uddhav Thackeray ) आहे. एका वृत्तसंस्थेने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. या यादीत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक पहिल्या, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुसऱ्या, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन तिसऱ्या तर महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे चौथ्या क्रमांकावर आहेत आणि केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन पाचव्या स्थानी आहेत.
लोकप्रिय मुख्यमंत्री कोण आहे?
1 | ओडिशा | नवीन पटनायक- 71.1 टक्के |
2 | पश्चिम बंगाल | ममता बॅनर्जी - 69.9 टक्के |
3 | तामिळनाडू | एम. के स्टॅलिन - 67.5 टक्के |
4 | महाराष्ट्र | उद्धव ठाकरे - 61.8 टक्के |
5 | केरळ | पिनरयी विजयन - 61.1 टक्के |
ओडिशा, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, महाराष्ट्र, केरळ, दिल्ली, आसाम, छत्तीगढ आणि राजस्थान या नऊ राज्यांपैकी सर्वात जास्त लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून नवीन पटनायक यांना 71 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. तर चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत.