ETV Bharat / city

मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील चालू, प्रस्तावित पायाभूत सुविधा प्रकल्पांची दिली माहिती - पायाभूत प्रकल्प उद्धव ठाकरे

महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील चालू व प्रस्तावित पायाभूत सुविधा प्रकल्पांबद्दल ट्विटवरून माहिती दिली.

infrastructure cm Thackeray
पायाभूत प्रकल्प उद्धव ठाकरे माहिती
author img

By

Published : Nov 28, 2021, 10:32 PM IST

मुंबई - महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील चालू व प्रस्तावित पायाभूत सुविधा प्रकल्पांबद्दल ट्विटवरून माहिती दिली.

infrastructure cm Thackeray
प्रकल्पांबद्दल माहिती

हेही वाचा - 'Omicron Variant'ची दहशत, टाळेबंदी नको असेल तर नियम पाळा - मुख्यमंत्री

महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याने विरोधक प्रत्येक मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकारला व नेत्यांना लक्ष्य करत आहेत. ठाकरे सरकार दोन वर्षांत जनतेच्या प्रश्नांवर पूर्णपणे अपयशी झाले, अशी आगपाखड भाजप नेते आघाडी सरकारवर करत आहेत. अशा परिस्थितीत राज्यात पायाभूत सुविधांची काय अवस्था आहे, विशेषकरून रस्त्यांबद्दल मुख्यमंत्र्यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये रस्त्यांच्या बाबतीत पायाभूत सुविधा व प्रस्तावित प्रकल्पांविषयी माहिती देण्यात आलेली आहे.

काय आहे ट्विटमध्ये?

'ब्रिजिंग डिस्टन्स कनेक्टिंग लाईफ' अशी टॅग लाईन देत मुख्यमंत्र्यांनी रस्त्यांच्या बाबतीत चालू आणि प्रस्तावित पायाभूत सुविधांची कामे याची माहिती दिली आहे. मुंबई आणि नागपूरला जोडणारा ७०१ किमी लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, मुंबई कोस्टल रोड, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे चा विस्तार, मुंबई - गोवा 4 लेन कोस्टल रोड. 21 किमी लांबीचा भिवंडी - कल्याण - शिळफाटा रस्ता, वर्सोवा - वांद्रे सी लिंक, मुंबईते सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड कोकण द्रुतगती मार्ग, पुणे - नाशिक हायस्पीड रेल्वे आणि राज्यातील इतर विकास कामांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.