ETV Bharat / city

जुने व्हायरस पुन्हा आलेत, त्यांचा बंदोबस्त करावा लागेल - उद्धव ठाकरे - नारायण राणे बातमी

जुने व्हायरस पुन्हा आले असून, कारण नसताना साईड इफेक्ट आणत आहेत. त्यांचा बंदोबस्त करावा लागेल, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.

CM Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Aug 26, 2021, 5:04 PM IST

Updated : Aug 26, 2021, 5:10 PM IST

मुंबई - कोरोना अद्याप गेलेला नाही. अशातच जुने व्हायरस पुन्हा आले असून, कारण नसताना साईड इफेक्ट आणत आहेत. त्यांचा बंदोबस्त करावा लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगत नारायण राणे यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे. राज्यात यामुळे पुन्हा नारायण राणे विरोधात मुख्यमंत्री असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - भाजपा हा महान पक्ष आहे, ते परग्रहावरील लोकांवरही गुन्हा दाखल करू शकतात - संजय राऊत

  • हळूहळू सर्व उघडणार - ठाकरे

दुर्देवाने आजच्या वातावरणात मी सावधतेने पावले टाकतोय. अजूनही कोरोनाचे संकट पूर्ण गेलेले नाही. काही जुने व्हायरस परत आलेत. जुने व्हायरस कारण नसताना साईड इफेक्ट आणत आहेत. त्यामुळे दोघांचा बंदोबस्त करायचा आहे. जगभराचा अनुभव घेतल्यानंतर १०० दिवसानंतर कोरोनाचा व्हायरस पुन्हा वरती येतो. त्यामुळे मधला काळ अर्थचक्राला गती देण्यासाठी वापरला पाहिजे. काहीजण सांगतात, तुम्ही हे उघडले तर ते का उघडत नाहीत. थोडं थांबा आपण एकएक टप्प्याने सगळे व्यवहार खुले करायचे आहेत. कोणालाही बंधनात ठेवायचे नाही. तसेच हळुवारपणे मास्कसुद्धा काढून ठेवायचा आहे. तो घाईघाईत काढला तर मग आपण कधीच मास्क काढू शकणार नाही, अशी भिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केली.

  • राजकारण चालू राहील पण जनतेच्या रोजीरोटीचे काय? - मुख्यमंत्री

येथे सर्व राजकीय पक्षांच्या लोकांना बोलवून जाणीव करुन द्यायला पाहिजे की, तुमचे राजकारण चालू राहील. पण आज जनतेसमोर त्यांच्या रोजीरोटीची भ्रांत आहे. त्याचे पहिले काय करणार ते सांगा? जर रोजीरोटी मिळाली नाही तर संपूर्ण राज्यात, देशात आणि जगात अस्वस्थता आणि अस्थितरता माजल्याशिवाय राहणार नाही. यासाठी मला पुढच्या काळामध्ये या उद्योजकांची आणि उद्योगाची आपल्या राज्यामध्ये फार मोठी गरज असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

हेही वाचा - डिसेंबरपर्यंत ओबीसींचे राजकीय आरक्षण दिले नाही तर मंत्र्यांना गावबंदी; चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

Last Updated : Aug 26, 2021, 5:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.