मुंबई - तेलंगाणा, महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्याने व्हॅट कमी केला नसल्यामुळे या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अधिक (Petrol Diesel Price Hike Crisis) आहेत, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi on Fuel Price Hike) यांनी आज सर्व राज्यांच्या घेतलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत केले होते. पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray on Fuel Price Hike) यांनी इंधन दरवाढीबाबतचा खुलासा केला. देशाच्या विकासात सर्वात मोठे योगदान देणाऱ्या महाराष्ट्रासारख्या राज्याला आर्थिक बाबतीत सापत्न वागणूक दिली जात आहे. नागरिकांना वस्तुस्थिती कळावी म्हणून हे स्पष्ट करणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.
-
Today, diesel tax share on a ltr of diesel in Mumbai is Rs 24.38 for the Center&Rs 22.37 for the state. Petrol tax share is Rs 31.58 as central tax& Rs 32.55 as state tax. Therefore, it's not a fact that the prices have become more expensive due to state,says CM: Maharashtra CMO
— ANI (@ANI) April 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Today, diesel tax share on a ltr of diesel in Mumbai is Rs 24.38 for the Center&Rs 22.37 for the state. Petrol tax share is Rs 31.58 as central tax& Rs 32.55 as state tax. Therefore, it's not a fact that the prices have become more expensive due to state,says CM: Maharashtra CMO
— ANI (@ANI) April 27, 2022Today, diesel tax share on a ltr of diesel in Mumbai is Rs 24.38 for the Center&Rs 22.37 for the state. Petrol tax share is Rs 31.58 as central tax& Rs 32.55 as state tax. Therefore, it's not a fact that the prices have become more expensive due to state,says CM: Maharashtra CMO
— ANI (@ANI) April 27, 2022
राज्य आणि केंद्र सरकार आमनेसामने - महाराष्ट्राला केंद्रीय कराच्या ५.५ टक्के रक्कम मिळते. एकूण थेट करात ( डायरेक्ट टॅक्स) महाराष्ट्राचा वाटा ३८.३ टक्के एवढा आहे. संपूर्ण देशात सर्वात जास्त म्हणजे १५ टक्के जीएसटी महाराष्ट्रातून गोळा होतो. थेट कर आणि जीएसटी असे दोन्ही कर एकत्र केले तर महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावरील राज्य आहे. असे असूनही आजही राज्याला सुमारे २६ हजार ५०० कोटी रुपये जीएसटी थकबाकीपोटी मिळणे बाकी आहे.
मुख्यमंत्र्यांचे केंद्र सरकारवर आरोप - आज राज्य सरकार वारंवार राज्यातील आपत्तीच्या वेळी एनडीआरएफचे तोकडे निकष वाढवून आपत्तीग्रस्तांना मदत करण्याची मागणी केंद्राकडे करत आले आहे, मात्र, केंद्राने यावर काहीही पाऊले उचलली नाहीत. उलटपक्षी राज्याने विविध आपत्तीत निकषापेक्षा जास्त मदत करून दिलासा दिला आहे. तौक्तेसारख्या चक्रीवादळात गुजरातला महाराष्ट्रापेक्षा जास्त मदत केली गेली. शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा केवळ निर्णय घेतला नाही तर त्यांना ती मिळेल हे पाहिले. कोविड काळात सर्व दुर्बल, असंघटित क्षेत्रातील नागरिकांनाही आर्थिक साहाय्य केले. शिवभोजनसारखी थाळी मोफत दिली. आर्थिक आव्हानांना पेलत महाराष्ट्राने आपली जबाबदारी पार पाडली. संघराज्याविषयी बोलताना सर्व राज्यांना केंद्राकडून समान वागणूक मिळणे अपेक्षित आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यामुळे इंधनाचे दर वाढले नाहीत - आज मुंबईत एक लिटर डिझेलच्या दरामध्ये २४ रुपये ३८ पैसे केंद्राचा तर २२ रुपये ३७ पैसे राज्याचा कर वाटा आहे. पेट्रोलच्या दरात ३१ रुपये ५८ पैसे केंद्रीय कर तर ३२ रुपये ५५ पैसे राज्याचा कर आहे. त्यामुळे राज्यामुळे पेट्रोल व डिझेल महागले आहे ही वस्तुस्थिती नाही, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. राज्यातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने नैसर्गिक वायूच्या अनुषंगाने कर सवलती यापूर्वीच दिल्या आहेत. नैसर्गिक वायूच्या वापरास प्रोत्साहन देण्याकरिता या वायूवरील मुल्यवर्धित कराचा दर १३.५ टक्क्यांहून कमी करून तो ३ टक्के, पाईप गॅसधारकांना लाभ, सार्वजनिक वाहतूकदारांनाही लाभ, राज्यातील सर्व जिल्ह्यात पाईप गॅस वापरण्यास यामुळे प्रोत्साहन दिल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.
हेही वाचा - One Liter Petrol One Rupee : सोलापुरात आंबेडकर जयंतीनिमित्त फक्त 1 रुपयात 1 लीटर पेट्रोल