ETV Bharat / city

दरवर्षी पाण्याची पातळी मोजत रहायचे का? कायमस्वरूपी तोडग्यासाठी कटू निर्णय घ्यावे लागतील-मुख्यमंत्री - सांगली

दरवर्षी पाण्याची पातळी मोजण्यातच आयुष्य घालवायचे का? असा सवाल उपस्थित करत कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी आता कटू निर्णय घ्यावे लागतील, त्यासाठी सहकार्य करा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील पूरग्रस्तांशी संवाद साधताना केले.

दरवर्षी पाण्याची पातळी मोजत रहायचे का? कायमस्वरूपी तोडग्यासाठी कटू निर्णय घ्यावे लागतील-मुख्यमंत्री

author img

By

Published : Aug 2, 2021, 1:19 PM IST

सांगली : दरवर्षी पाण्याची पातळी मोजण्यातच आयुष्य घालवायचे का? असा सवाल उपस्थित करत कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी आता कटू निर्णय घ्यावे लागतील, त्यासाठी सहकार्य करा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील पूरग्रस्तांशी संवाद साधताना केले. कुणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. सांगलीच्या भिलवडी येथे पूरग्रस्तांशी संवाद साधताना ते बोलत होते.

दरवर्षी पाण्याची पातळी मोजत रहायचे का? कायमस्वरूपी तोडग्यासाठी कटू निर्णय घ्यावे लागतील-मुख्यमंत्री
पूरग्रस्तांची घेतली भेटसांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी सोमवारी सकाळी दाखल झाले. पलूस तालुक्यातील भिलवडी येथून मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाच्या दौऱ्याची सुरुवात केली. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधत झालेले नुकसान आणि अडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार धैर्यशील माने, आमदार सुमन ताई पाटील, आमदार मोहनराव कदम आदी उपस्थित होते. यावेळी उध्दव ठाकरे यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधताना मोठे संकट आपल्या सर्वांवर कोसळले आहे, मात्र यातून आपण नक्कीच बाहेर पडू असे आश्वासन दिले. जे पंचनामे सुरू आहेत, त्यातून मदतीसंदर्भात अंदाज घेतला जाणार आहे. कुणालाही वाऱ्यावर न सोडता भरीव मदत केली जाईल,असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.कटू निर्णय घ्यावे लागतीलकाही ठिकाणी कायमस्वरूपी तोडगा काढावा लागेल. कटू निर्णय घ्यावे लागतील. आपली त्याला तयारी हवी, कारण दरवर्षी हे पुंरचे संकट येणार आणि आपण त्यातून उभे राहणार, की परत दुसऱ्या वर्षी तेच. दरवर्षी पाण्याच्या पातळ्या मोजण्यात आयुष्य घालवायचे नाही. कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार म्हणून जे आपल्या हिताचे आहे, ते करणार. असं काही झाले की लगेच पॅकेज जाहीर केले जाते. मग त्यातला पैसा कुठे जातो ते कळत नाही. मला प्रामाणिकपणे आपल्यासाठी काम करायचे आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपल्या सूचनांचा नक्की विचार करू, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

हेही वाचा - बाटग्यांमुळे भाजपाचा अंतकाळ जवळ, शिवसेनेशी पंगा सोडा नाहीतर औषधाला उरणार नाहीत - शिवसेना

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.