ETV Bharat / city

विरोधकांनो पोटदुखी थांबवा..! लॉकडाऊन हटवून जनतेच्या जीवाची जवाबदारी घेणार का? - उद्धव ठाकरे

सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. त्यावेळी राऊत यांनी विरोधी पक्ष नेते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा न करता दिल्लीला जात आहेत, हे कितपत योग्य आहे. असा प्रश्न सवाल उद्धव ठाकरे यांना विचारला, त्यावेळी ठाकरे यांनी माझ्या कामाबाबत विरोधकांना पोटदुखी असल्याटी टीका केली.

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे
author img

By

Published : Jul 25, 2020, 10:02 AM IST

मुंबई - मी काम करत नाही, अशा प्रकारे कोण काय बोलते आणि काय करतोय याच्याशी मला देणे घेणे नाही, मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे. जे बोलताहेत त्यांची माझ्या कामाबाबत पोटदुखी असेल. मात्र, देशातल्याच एका संस्थेने मी कुठेही न जाता न फिरता, देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये माझी निवड केली. ही निवड देखील विरोधकांच्या पोटदुखीचे कारण असू शकते, अशी खोचक टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावरून केली आहे.

सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. त्यावेळी राऊत यांनी विरोधी पक्ष नेते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा न करता दिल्लीला जात आहेत, हे कितपत योग्य आहे. असा प्रश्न सवाल उद्धव ठाकरे यांना विचारला, त्यावेळी ठाकरे यांनी माझ्या कामाबाबत विरोधकांना पोटदुखी असल्याटी टीका केली.

ठाकरे म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बहुधा दिल्लीतील कोरोनाची परिस्थिती पाहण्याासाठी गेले असतील. कारण त्यांनी त्यांचा आमदारकीचा फंड जो महाराष्ट्राचा आहे, तो दिल्लीत दिला. त्यामुळे ते सगळ्या गोष्टी दिल्लीत जाऊन करत असतील असे म्हणत त्यांनी फडणवीस यांच्यावर पंतप्रधान सहाय्यता निधीवरून यावेळी निशाणा साधला.

कोरोनासह लॉकडाऊनबाबत काय म्हणाले ठाकरे-

जोपर्यंत कोरोनासोबत जगणं आपण शिकत नाही किंवा स्वीकारतच नाही तो पर्यंत काही गोष्टी अपरिहार्यपणे कराव्या लागतील, उगाचच फिरण आणि गर्दी करणे हे टाळले पाहिजे, असे ही ठाकरे यावेळी फेसबूक लाईव्हच्या प्रश्नाबाबत बोलताना म्हणाले.

  • हे ठाकरे सरकार आहे, या प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी सरकारचे नेतृत्व करतोय हा एक भाग आहे. मात्र हे महाविकास आघाडी सरकार तीन पक्षाचे आहे. सोबत असलेल्या अपक्ष पक्षांसह ज्यांनी विश्वास ठेवला या जनतेचे हे सरकार असल्याचे त्यांनी स्पष्टीकरणल यावेळी या मुलाखतीतून दिले.
  • प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग न करुन घेणारे दुर्भागी - ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रालयात कमीवेळा गेल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने होते. यासंदर्भातील संजय राऊत यांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले, माझ्या घरात बसून काम करण्यामुळे यंत्रणेवरचा ताण कमी झाला आहे. तसेच 'मंत्रालय आता बंद आहे हे लक्षात घ्या. मंत्रालयात कमीत कमी गेलो असा जो आरोप होत आहे, त्यात काही दम नसल्याचे म्हणत त्यांनी विरोधकांच्या आरोपाला योग्यरित्या उत्तर दिले.

प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग न करुन घेणारे दुर्भागी आहेत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण कितीतरी कामे करू शकतो. मी घरात बसून रोजच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील प्रमुख अधिकऱ्यांच्या बैठका घेतोय. लोकप्रतिनिधींशी संवाद साधतोय. मी घरात बसून एकाच वेळी संपूर्ण राज्य कव्हर करतोय आणि तातडीने निर्णय घेत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच जनतेशी माझा सध्या लाॉकडाऊनमुळे थेट संवाद होत नाही. मात्र, सध्या सभा घेणे म्हणजे जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.

  • तर लॉकडाऊनचे विरोधक जबाबदारी घेणार का?

लॉकडाऊन हटवण्यासंदर्भात काही जणांकडून मागणी केली जात आहे, किंवा लॉकडाऊन लागू कऱण्याच्या निर्णयाला हा काय उपाय आहे का? अर्थव्यवस्था खीळखीळ झाली, अशी टीका विरोधकांसह काही शहाणे लोक करत आहेत.

परंतु अर्थव्यवस्थेच्या संकटाची जाणीव आम्हालाही आहे. मात्र, समजा मी लॉकडाऊन उघडला त्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढून ज्या लोकांचे बळी जातील, त्यांची जबाबदारी हे लोक घेणार आहेत का? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनला विरोध करणाऱ्यांना यावेळी केला. त्यामुळे मी परिस्थितीनुरूप हळूहळू काही गोष्टी सुरु करतोय, एकदा सुरु केलेले पुन्हा बंद करावे लागणार याचीही काळजी घेतली जातेय, आणि नागरिकांच्या आरोग्यालाही प्राधान्य देण्याचा माझा प्रयत्न असल्याचे ठाकरे म्हणाले.

  • मी फिरत नाही, घरी बसतो म्हणून अभ्यास होतो - उद्धव ठाकरे

कोरोनाच्या काळात ठाकरे यांनी अभ्यासपूर्ण माहिती दिली. तेवढा तुम्ही रिसर्च केला असल्याचे जाणवते असा सवाल, संजय राऊत यांनी विचारला असता, तेवढा अभ्यास नाही केला तर मी मुख्यमंत्री म्हणून कसा काम करणार ? आणि "मी फिरत नाही, घरी बसतो म्हणून अभ्यास होतो. अभ्यास न करता फिरणं आणि न फिरता अभ्यास करणं यात तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही ठरवा.", असे म्हणत ठाकरे यांनी मिश्कीलपणे फडणवीसांच्या अभ्यासावरून निशाणा साधला.

सौजन्य - दैनिक सामना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.