मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील सर्व्हाइकल स्पाईन सर्जरी (CM Thackeray Spine surgery) यशस्वी झाली आहे. त्यांची प्रकृती उत्तम आणि स्थिर आहे. एच.एन. रिलायन्स रुग्णालयात (hn reliance hospital) त्यांची फिजिओथेरपी सुरू आहे. डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे.
हेही वाचा - Kangana Ranaut : कंगना रणौतच्या घराबाहेर कडक पोलीस बंदोबस्त
१० नोव्हेंबरला रुग्णालयात दाखल
१० नोव्हेंबरला मुख्यमंत्री एचएन रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले होते. दोन - तीन दिवस रुग्णालयात उपचार घेणार असल्याचे त्यांनी म्हटले.
योग्य वेळी डिस्चार्ज
तब्बल २० दिवस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत होते. आज मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर सर्व्हाइकल स्पाईन शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान मुख्यमंत्र्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर होती. शस्त्रक्रियेनंतर त्यांना रुग्णालयातील कक्षात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती उत्तम आणि स्थिर आहे. तसेच, योग्य वेळी त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, असे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.
हेही वाचा - Share Market : आठवड्याच्या सुरूवातीला शेअर बाजार गडगडला! सेन्सेक्समध्ये 1000 अंकांची घसरण!