ETV Bharat / city

Amravati Contaminated Water Case : मेळघाटात दूषित पाणी पिल्याने तिघांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून परिवाराला 5 लाखांची मदत - एकनाथ शिंदे मेळघाट प्रकरणी 5 लाखांची मदत

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात दूषित पाणी पिल्याने तीन जणांचा मृत्यू झाला ( Amravati Contaminated Water Case ) होता. त्या तीन जणांच्या परिवाराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली ( CM Eknath Shinde announced To Provide Rs 5 lakh ) आहे.

eknath shinde onAmravati Contaminated Water Case

author img

By

Published : Jul 9, 2022, 6:56 PM IST

Updated : Jul 9, 2022, 7:17 PM IST

अमरावती - अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात असलेल्या पाचडोंगरी आणि कोयलारी गावात खुल्या विहिरीतील दूषित पाणी पिल्यामुळे 50 जणांना अतिसाराची लागण ( Amravati Contaminated Water Case ) झाली. या घटनेत तीन नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या परिवाराला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तीन नागरिकांच्या परिवाराला प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार ( CM Eknath Shinde announced To Provide Rs 5 lakh ) आहे.

  • Maharashtra | CM Eknath Shinde announced to provide Rs 5 lakh each from CM Assistance Funds to the families of those who died due to drinking contaminated water from wells in Pachdongari & Koylari villages in Amravati district: CMO

    — ANI (@ANI) July 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन - मेळघाट परिसरातील पाच डोंगरी आणि कोयलारी गावात खुल्या विहिरीतील दूषित पाणी पिल्याने 50 जणांची प्रकृती खराब झाली होती. या सर्वांना अतिसाराची लागण झालेली. यामधील 3 जणांचा मृत्यूही झालेला. त्याची माहिती मिळताच दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना संपर्क साधला होता. रुग्णांवर तातडीने उपचार करावेत, तसेच गरज पडल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करावे, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असली तरी उर्वरित नागरिकांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. सर्व रुग्णांना योग्य उपचार मिळतील तसेच मृतांचा आकडा वाढू नये यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पिण्यासाठी गढूळ पाण्याचा वापर - मेळघाटात दिवसेंदिवस पाणी टंचाईची परिस्थिती भीषण होत चालली आहे. मेळघाट, चिखलधरा जवळ असलेल्या गावातील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. पण, लोकप्रतिनिधी या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे नागरिकांना पिण्यासाठी गढूळ पाण्याचा वापर करावा लागत आहे. गढूळ पाणी पिल्याने गावात अनेकांना खोकला, पोट दुखी सारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.

खासदार, आमदारांचे दुर्लक्ष - हनुमान चालीवरुन चर्चेत आलेल्या खासदार नवनीत राणा यांच्याकडून या गंभार समस्येकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे नवनीत राणांना केवळ निवडणुकीच्या वेळीच मेळघाटाची आठवण येते का?, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. राणा यांच्यासोबत जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर, मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनीही पाणी समस्येकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आलं आहे.

हेही वाचा - Amravati Chemist Murder Case : कोल्हेंच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी राणा दांपत्याचे हनुमान चालीसा पठण

Last Updated : Jul 9, 2022, 7:17 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.