ETV Bharat / city

समाज माध्यमांवर ट्रोलिंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांना समाज माध्यमांवर ट्रोल करण्यात येत आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हा विषय आज विधानसभेत मांडला. यावर ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

author img

By

Published : Jun 25, 2019, 2:36 PM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( फोटो सौजन्य विधानसभा )

मुंबई - अलिकडे समाज माध्यमांवर ट्रोलिंग वाढले आहे. त्यामुळे ट्रोल नियंत्रणासाठी कठोर कायदे केले जातील. मुंबई आयटी सेलला सूचना देऊन ट्रोलिंगमधील दोषींवर करवाई करु. भाजपचा ट्रोलर असेल, तरी कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.

अधिवेशनात बोलताना विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण तर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस

सत्ताधारी भाजपचे समर्थक सरकारवर टीका करणाऱ्यांना समाज माध्यमांवर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून धमक्या देत आहेत. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांच्या विरोधात सोशल मीडियावरुन ट्रोल करण्यात येत आहे. या विकृतांविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती.

सावंत यांना सरकारवर केलेल्या टीकेवरील ट्वीट संदर्भात ७ मे २०१९ पासून समाज माध्यमांवर अत्यंत हीन पातळीवर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली जात आहे. फोनवरून व समाज माध्यमांवरून जाहीर धमक्या दिल्या जात आहेत. यामध्ये मंत्रीमंडळातील मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक असल्याचेही दम या धमक्या देणाऱ्यांकडून दाखवला जात असल्याचा आरोप करण्यात आला .

Intro:Body:MH_Mum_Sachin_Sawant_CM_7204684

सचिन सावंत ट्रोलिंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करु : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांची विधानसभेत ग्वाही

मुंबई:अलिकडं समाजमाध्यमांवर ट्रोलींग वाढलं आहे. नियंत्रणासाठी कायदे कठोर केले जातील. मुंबई आयटी सेलला सूचना देऊन सचिन सावंत ट्रोलिंग दोषींवर करवाई करु. भाजपाचा ट्रोलर असेल तरी कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांची आज विधानसभेत दिली.

विरोधीपक्षनेते विजय वेडट्टीवार यांनी
सत्ताधारी भाजपचे समर्थक सरकारवर टीका करणा-यांना समाजमाध्यमांवर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून धमक्या देत आहेत असं सांगितले. कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांच्या विरोधात सोशल मिडीयावरील या विकृतांविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी केली होती.

सत्ताधारी भाजपचे समर्थक सरकारवर टीका करणा-यांना समाजमाध्यमांवर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून धमक्या देत आहेत.
७ मे २०१९ रोजी पासून सरकारवर केलेल्या टीकेवरील ट्वीट संदर्भात समाजमाध्यमांवर अत्यंत हीन पातळीवर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली जात असून फोनवरून व समाजमाध्यमांवरून जाहीर धमक्या दिल्या जात आहेत. यामध्ये राज्याच्या मंत्रीमंडळातील मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक असल्याचा
दंभ या धमक्या देणा-यांकडून दाखवला जात आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.