मुंबई - राज्यभरात पडणाऱ्या पावसाच्या ( Rain In Maharashtra ) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाऊस पडत असलेल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करत ( CM Eknath Shinde contact Collector ) आहेत. तेथील एकूण परिस्थितीचा आढावा घेत आहेत ( Understand Flood situation ). तसेच पूर परिस्थिती निर्माण झाली असलेल्या गावांमध्ये अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवणे. तसेच स्थानिक प्रशासनाकडून काय उपाय योजना करण्यात आल्या आहेत? हे पाहणे. तसेच अडकलेल्या नागरिकांना अन्न पाण्याची सोय करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी सर्व जिल्हाधिकार्यांना दिले आहेत.
रस्ते वाहतूकीवर परिणाम - राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून सातत्याने जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला ( villages lost Contact ) आहे. पडत असलेल्या जोरदार पावसामुळे रस्ते वाहतुकीवर त्याचा चांगला परिणाम ही पाहायला मिळतो आहे. या सर्व बाबी लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधा जिल्ह्यामध्ये केलेला उपायोजना आढावा घेतला. अनेक रस्ते जलमय ( Waterlogging On Roads ) झाले आहेत. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहम चालकांना वाहन चालवताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे.
राज्यभरात ऑरेंज आणि रेड अलर्ट - राज्यभरात पडणाऱ्या तुफान पावसामुळे हवामान विभागाने गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यभरात अनेक जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. गडचिरोली, चंद्रपूर, नाशिक, पुणे, पालघर या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेले आहेत. मुंबई, ठाणे, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, यवतमाळ, अमरावती, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी या जिल्ह्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधत पडत असलेला पावसाचा आढावा घेतला. तसेच त्वरित उपाययोजना करण्याचे आदेशही दिले आहेत.
मुसळधार पावसामुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा रद्द! - गुरुवारी मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हा अतिवृष्टीचा इशारा ( Heavy Rain Warning ) देण्यात आला आहे. अतिवृष्टीच्या देण्यात आलेल्या इशाऱ्यामुळे मुंबई विद्यापीठाने आपल्या आजच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपासून मुंबई, मुंबईसह उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. 11 ते 14 जुलैपर्यंत तीनही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात ( Orange Alert In Three Districts ) आला होता. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून या परिसरात मुसळधार पाऊस बरसत आहे.
शाळांना सुट्टी जाहीर - मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिकेने गुरुवारी शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. महानगर पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी हा आदेश काढला आहे. नवी मुंबई परिसरात पडणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने ठाणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 14 जुलै रोजी शहरातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - Flood In Chandrapur: चंद्रपूरमध्ये पुरात अडकलेल्या 22 वाहनचालकांना पोलिसांनी सुखरूप बाहेर काढले