मुंबई - आरोप रियाज भाटी मुंबई पोलिसांनी सोमवारी 26 सप्टेंबर रोजी अटक केल्यानंतर आज मंगळवार (दि. 27 सप्टेंबर)रोजी मुंबईतील किल्ला कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते. सलीम फ्रुट्स हा तक्रारदाराला धमकी देऊन 62 लाख रुपयांची मागणी करत होता. तक्रारदाराकडे पैसे नसल्याने सलीम फ्रुटने तक्रारदाराची गाडी घेऊन गेली होता. कारची किंमत 30 लाख असून उर्वरित 32 लाखांसाठी छोटा शकीलच्या नावाने तक्रारदाराला धमकी देत होता. काही दिवसांनंतर जेव्हा एनआयएने सलीम फ्रूटला अटक केली. तेव्हा, दुसऱ्या एका प्रकरणात रियाझ भाटीने तक्रारदाराला फ्रूटच्या वतीने धमकवून पैशाची मागणी केली होती. त्यानंतर पीडितेने वर्सोवा पोलिसांत विरोधात एफआयआर दाखल केला आहे.
रियाझ भाटी यांच्या वतीने वकील तारिक सय्यद यांनी असा युक्तिवाद केला, की सलीम फ्रूट याने पोलीस कोठडीत सर्व आरोप व कारवाया केल्याचे सांगण्यात आले. या रियाझ भाटीची कोणतीही भूमिका नाही. रियाझ भाटी आणि सलीम फ्रुट हे फळांचे व्यापारी असून दोघेही एकमेकांसोबत व्यवसाय करत होते.
या प्रकरणी पोलिसांची पूर्ण रिमांड सलीम फ्रुट यांच्या विरोधात आहे. जो एनआयएच्या ताब्यात आहे, तो एनआयएकडून त्याची कस्टडी घेऊ शकतो, त्यांना भाटीच्या कोठडीची काय गरज आहे? असा प्रश्न देखील रियाझ भाटीच्या वकिलांकडून पोलिसांना करण्यात आला आहे. सलीम फ्रूट हा छोटा शकीलचा नातेवाईक असून पोलिसांना या प्रकरणाचा फ्रूटकडून तपास करायचा आहे. मग रियाझ भाटीच्या कोठडीची काय गरज आहे? वकील तारक सय्यद यांनी म्हटले आहे.
मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी शाखेच्या पथकाने सोमवारी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जवळचा सहकारी रियाझ भाटी याला खंडणीशी संबंधित एका प्रकरणात अटक केली. पोलिस अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली. भाटीचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे सांगण्यात येत असून वर्सोवा पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात तो हवा होता असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रियाझ भाटी आणि मोहम्मद सलीम इक्बाल कुरेशी उर्फ सलीम फ्रूट यांनी वर्सोव्यातील एका व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. हे दोघेही दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलचे जवळचे नातेवाईक असल्याचे सांगण्यात येत आहे. भाटी आणि सलीम फ्रूट यांनी व्यापाऱ्याकडून 30 लाख रुपयांची कार आणि 7.5 लाख रुपयांची रोकड वसूल केल्याचे त्यांनी सांगितले.
इब्राहिमचा जवळचा सहकारी छोटा शकील आणि शकीलचा नातेवाईक सलीम फ्रूट यांचीही एफआयआरमध्ये नावे आहेत. मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी सेलने अंधेरी पश्चिम येथून आरोपीला अटक केली आहे. आरोपीला आज मंगळवार 27 सप्टेंबर न्यायालयात हजर करण्यात आले आहे. यापूर्वी भाटीला खंडणी, जमीन हडपणे, गोळीबार अशा अनेक गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली आहे. त्याने 2015 आणि 2020 मध्ये बनावट पासपोर्ट वापरून देशातून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.