ETV Bharat / city

Assembly Winter Session : मजूर प्रश्नावर नवाब मलिक व प्रवीण दरेकर यांच्यात विधान परिषदेत खडाजंगी - Pravin Darekar labor controversy

हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारला ( Assembly Winter Session ) कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी एकही मुद्दा शिल्लक ठेवला नाही. दुसरीकडे विरोधकांनाच भेटेल त्या मुद्द्यावर कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सरकारकडून होताना दिसत आहेत. याच पद्धतीने बुधवारी अनपेक्षितपणे कामगार मंत्री नवाब मलिक यांनी प्रवीण दरेकर यांच्याविषयी ( Nawab Malik raised question on Pravin Darekar ) मजूर या संस्थेवरून मुद्दा उपस्थित केला.

नवाब मलिक व प्रवीण दरेकर
नवाब मलिक व प्रवीण दरेकर
author img

By

Published : Dec 23, 2021, 2:29 AM IST

मुंबई - विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे यंदाची मुंबई जिल्हा बँकेची निवडणूक मजूर या संस्थेमार्फत लढवत असल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे कुठल्या अनुषंगाने मजूर आहेत, असा प्रश्न कामगार मंत्री नवाब मलिक यांनी विधान परिषदेमध्ये उपस्थित केला. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकातील हा वाद ( Clashes between Nawab Malik and Pravin Darekar ) चिघळला आहे.

मजूर प्रश्नी प्रवीण दरेकर गोत्यातहिवाळी अधिवेशनामध्ये सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी एकही मुद्दा शिल्लक ठेवला नाही. दुसरीकडे विरोधकांनाच भेटेल त्या मुद्द्यावर कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सरकारकडून होताना दिसत आहेत. याच पद्धतीने बुधवारी अनपेक्षितपणे कामगार मंत्री नवाब मलिक यांनी प्रवीण दरेकर यांच्याविषयी मजूर या संस्थेवरून ( Pravin Darekar labor controversy ) मुद्दा उपस्थित केला. नवाब मलिक म्हणाले, की आपण इथे निवडून येत असताना शपथेवर माहिती देतो. मला सांगा प्रवीण दरेकर यांनी २०१६ साली शपथ पत्र सादर केले. त्यात जे इन्कम दाखवण्यात आले होते, त्यात आता मोठी वाढ झाली आहे. हे मजूर संस्थेकडून निवडणूक लढत आहेत. त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा, असा प्रश्न मलिकांनी उपस्थित केला.या विषयावर विशेष चर्चा घ्या. राज्यात शेतकरी नाही, तो शेतकरी झाला आहे. जो माथाडी नाही, तो माथाडी झाला आहे. या विषयावर एक विशेष चर्चा घ्या. माझे त्याला पूर्ण समर्थन आहे, असे प्रवीण दरेकर म्हणाले.

सहकार विभागाकडून चौकशी सुरूयाबाबत सहकार विभाग चौकशी करत आहे. जो अहवाल येईल तो पटलावर ठेवावा, असे आदेश सभापती रामराजे निंबाळकर यांनी ( Ramraje Nimbalkar order in Pravin Darekar case ) दिले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.