मुंबई - शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या चारही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात आंदोलने सुरू केल्याने त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होतो ( Mumbai Different Party Agitation ) आहे. दररोजच्या आंदोलनांमुळे मुंबईतील रस्ते वाहतूक खोळंबून राहत ( Mumbai Traffic Jam ) आहे.
काँग्रेसने आज भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या कांदिवली येथील निवासस्थानाजवळ आंदोलन ( Congress Agitation Gopal Shetty Home ) केले. काँग्रेसच्या आंदोलनामुळे कांदिवली डीमार्ट परिसरातील रस्ता सुमारे दोन तासांसाठी बंद करण्यात आला होता. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. पोलिसांनी शेवटी त्यांना उचलून ( Police Arrested Congress Worker ) नेले. मात्र, या सर्व घडामोडीत सामान्य नागरिकांना वाहतूक खुली होण्याची वाट पहावी लागली.
सागर बंगल्याबाहेरील काँग्रेसचे आंदोलन
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थाना बाहेर काँग्रेसने सोमवारी ( Congress Agitation Against Devendra Fadnavis ) आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान ही काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवाय मलबार हिल सारखा परिसरातही सुमारे दीड तास वाहतुकीचा खोळंबा झाला. "राजकीय पक्षांच्या परस्परांविरुद्ध सुरू असलेल्या या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास होत असून, नागरिकांना आपल्या कामावर कार्यालयात अथवा अन्य कारणांसाठी जाण्यास उशीर होत आहे. राजकीय पक्षांच्या या स्टंटबाजी आंदोलनामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचे मत" ज्ञानेश्वर तेजम यांनी व्यक्त केले.
दादरमधील आंदोलन
दादर पूर्व येथील भाजपाच्या कार्यालयाबाहेर काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दिकी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. तेव्हाही भाजपा, काँग्रेस समोरासमोर आल्याने नागरिकांना दोन तास ताटकळावे लागल्याची खंत गणेश ठापरे यांनी व्यक्त केली आहे. एकूणच राजकीय पक्षांच्या परस्परांच्या विरोधातील आरोपांच्या खेळात आणि आंदोलनाच्या स्टंटबाजीत सर्वसामान्य माणूस नाहक भरडला जात आहे. वाहतूकीची कोंडी नित्याचीच असते त्यात आता या आंदोलनांची भर पडल्याने हैराण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.