ETV Bharat / city

लॉकडाउन; जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची बाजारात गर्दी - corona lockdown

बीड जिल्ह्यात गुरुवारी रात्री 12 नंतर पुढील दहा दिवसांसाठी लॉकडाउन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत. यावेळेस मोंढा परिसरात नागरिकांनी खरेदी करण्यासाठी गर्दी केला होती.

बीड जिल्हयात लॉकडाऊन
बीड जिल्हयात लॉकडाऊन
author img

By

Published : Mar 25, 2021, 11:57 AM IST

बीड- जिल्ह्यात गुरुवारी रात्री 12 नंतर पुढील दहा दिवसांसाठी लॉकडाउन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत. दरम्यान गुरुवारी बीड शहरातील मोंढा परिसरात नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले. बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बीड जिल्ह्यात सक्रिय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2000 एवढी आहे. याशिवाय कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण रेट 13 टक्के एवढा आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची साखळी तोडण्यासाठी पुढील दहा दिवसांसाठी चार एप्रिल पर्यंत बीड जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर केले आहे.

लॉक डाऊन च्या काळात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी गुरुवारी बीड शहरातील मोंढा भागात ग्राहकांनी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. किराणा, भाजीपाला तसेच इतर आवश्यक वस्तू ग्राहक खरेदी करत होते.

बीड जिह्यातील बाजारात गर्दी

हेही वाचा -कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 10 बियरबारवर पोलिसांचे छापे

या बाबी राहणार कडेकोट बंद
बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिलेल्या आदेशानुसार सार्वजनिक-खासगी क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बगीचे हे संपूर्णतः बंद राहतील. तसेच सार्वजनिक ठिकाणी जमावबंदीचे आदेश दिले आहेत.उपहारगृह, रेस्टॉरंट, लॉज, हॉटेल, मॉल, बाजार मार्केट बंद असतील. सर्व केशकर्तनालय, सलुन ब्युटी पार्लर, शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था प्रशिक्षण संस्था सर्व प्रकारच्या शिकवण्या पूर्णतः बंद राहणार आहेत.याबरोबरच सार्वजनिक व खासगी बस सेवा, ट्रक, टेम्पो, ट्रेलर, ट्रॅक्टर, इत्यादीसाठी संपूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.

हेही वाचा - महाराष्ट्रात कोरोनाचे आज किती रुग्ण? वाचा नेमकी स्थिती...

अत्यावश्यक सेवेसाठी अशी आहे व्यवस्था
सर्व किराणा दुकानाचे विक्रेते सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत सुरू राहतील.किरकोळ विक्रेत्यांना सकाळी सात ते नऊ या वेळेतच केवळ दुकानातून घरपोच किराणा मालाचा पुरवठा करता येईल.या दरम्यान सामाजिक अंतर व मास्क वापरणे बंधनकारक राहील. दूध विक्री व वितरण सकाळी दहा वाजेपर्यंत घरपोच राहील.दूध संकलन नेहमीप्रमाणे विहित वेळेनुसार सुरू ठेवता येईल. त्या दरम्यान सामाजिक आंतर व मास्क वापरणे बंधनकारक राहील.भाजीपाला व फळांची विक्री सकाळी सात ते दहा या वेळेत करता येईल. फळ विक्रेत्यांना गल्लोगल्ली फिरून सकाळी 7 ते 12 या वेळेतच फळ व भाजीपाला यांची विक्री करता येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.