पुणे - महाराष्ट्रातील काही अपवादात्मक जिल्हे सोडल्यास कोरोना रुग्ण संख्या अटोक्यात येऊ लागली आहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील मंदिरे खुली केली. आता चित्रपटगृहे व नाट्यगृहेही खुली केली जाणार आहेत. त्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी नुकतेच दिले होते. त्यानुसार मंगळवारी राज्य शासनाने नाट्यगृहे सुरू करण्यासंदर्भातील आदेश काढले. मात्र, नाट्यगृहे सुरू करताना काही अटी व शर्ती लागू करण्यात आल्या आहेत.
काय आहेत अटी या शर्ती
- चित्रपटगृहे, नाटय़गृहे ५० टक्के आसनक्षमतेसह सुरू करण्यास परवानगी असेल.
- दोन प्रेक्षकांमध्ये एका खुर्चीचे अंतर ठेवावे.
- चित्रपटगृहांमध्ये मोकळ्या जागांमध्ये गर्दी होणार नाही, याची काळजी घेणे बंधनकारक आहे.
- सिनेमागृहांमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांना मुखपट्टी बंधनकारक आहे.
हेही वाचा - Gangster Suresh Pujari : कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारीला फिलिपिन्समध्ये अटक; सूत्रांची माहिती