ETV Bharat / city

आता १०० टक्के क्षमतेने सुरू होणार सिनेमागृहे, केंद्राची नवीन नियमावली जाहीर - heatres coronavirus COVID-19

लॉकडाऊनमुळे चित्रपटसृष्टीला देखील मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागला. पण आता हळूहळू सर्व गोष्टी पूर्वपदावर येत आहेत. आता केंद्र सरकारने चित्रपटगृह 100 टक्क्यांनी सुरू करण्यास परवानगी दिली आहे. याआधी ऑक्टोबर महिन्यात 50 टक्के उपस्थितीच्या आधारावर चित्रपटगृह सुरू करण्यात आली होती.

प्रकाश जावडेकरांचे ट्विट
प्रकाश जावडेकरांचे ट्विट
author img

By

Published : Jan 31, 2021, 5:38 PM IST

Updated : Jan 31, 2021, 6:47 PM IST

मुंबई - मात्र 1 फेब्रुवारीपासून 100 टक्क्यांनी चित्रपटगृह सुरू करण्यात येणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे चित्रपटसृष्टीतील मंडळींना दिलासा मिळाला आहे. मात्र सरकारने घालून दिलेल्या अटी आणि निर्देशांनुसार चित्रपटगृह सुरू करण्यात येणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सिनेमागृहे संपूर्ण क्षमतेने सुरू करता येतील अशी घोषणा केली आहे. मात्र सिनेमागृहात निर्जंतुकीकरण आणि कोविड नियमावलीचे काटेकोरपणे पालन केले गेले पाहिजे अशा सुचनाही दिल्या आहेत.

लोकांना सिनेमागृहाच्या आतमध्ये असलेल्या स्टॉलवरून पदार्थ खरेदी करता येतील, पण काही निर्बंध अजूनही सिनेमगृहावर असणार आहेत, कारण आता कोविड संपुष्टात येण्याच्या मार्गावर असला तरी खबरदारी घेणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने 27 जानेवारी 2021 तारखेच्या आदेश क्रमांक 40-3/2020- DM-I(A) अनुसारे सिनेमागृह आणि नाट्यगृह सुरू करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या ठिकाणी चित्रपटाचे प्रदर्शन करता येणार नाही आणि संबंधित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश त्यांच्या संबंधित क्षेत्रामध्ये मूल्यांकनानुसार योग्य ती अतिरिक्त खबरदारी घेण्याबाबतच्या उपायांचा विचार करू शकतात.

प्रकाश जावडेकरांचे ट्विट
प्रकाश जावडेकरांचे ट्विट
दोन शोमध्ये विशिष्ठ कालावधीचे राहणार अंतर -सभागृहाच्या आवाराच्या आतमध्ये सर्व प्रकारच्या सुरक्षा विषयक उपायांची अंमलबजावणी काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. सामान्य मार्गदर्शक सूचनांमध्ये असे सांगण्यात आले आहे की, श्वसन विषयक शिष्टाचारांचे पालन करणे आवश्यक आहे, चेहऱ्यावर मास्क वापरणे, सभागृहात आणि बाहेर किमान 6 फूट आणि जास्तीत जास्त सामाजिक अंतर पाळणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी, प्रतिक्षा कक्षांमध्ये थुंकणे प्रतिबंधित असेल आणि आरोग्य सेतूचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले पाहिजे.सिनेमागृहात येणाऱ्या प्रत्येकाचे प्रवेशद्वाराशी आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग झाले पाहिजे. येथील गर्दी टाळण्यासाठी रांगेत उभे राहून ही प्रक्रिया पार पाडावी. एक स्क्रीन किंवा अनेक स्क्रीन असलेल्या सिनेमागृहांमध्ये मध्यंतराच्या वेळी प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याच्या दाराजवळ गर्दी टाळण्यासाठी लोकांना रांगेने बाहेर पडता यावे, याकरिता पुरेसा वेळ दिला जाणार आहे. गर्दी टाळण्यासाठी मल्टिप्लेक्स सिनेमागृहांमध्ये सिनेमा प्रदर्शनाच्या वेळांची विभागणी केली जाईल.
  • सरकारने घालून दिलेल्या अटी आणि निर्देश
    सोशल डिस्टंसिंगची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.
    चित्रपटगृहामध्ये मास्क लावणे अनिवार्य आहे.
    प्रेक्षकांच्या सुरक्षिततेसाठी चित्रपटगृहांमध्ये एण्ट्री करण्यापूर्वी प्रेत्येक व्यक्तीचे शरीर तापमान पाहिले जाणार आहे.
    चित्रपटगृहाच्या प्रवेश द्वाराजवळ आणि बाहेर जाण्याच्या मर्गावर सेनिटायझरची सुविधा असायला हवी.
    प्रत्येक प्रेक्षकांच्या स्मार्ट फोनमध्ये आरोग्य सेतू अॅप बंधनकारक आहे.

    शीतपेय, खाद्यपदार्थ, तिकीटे इत्यादीच्या व्यवहारासाठी संपर्क टाळण्यासाठी डिजीटल पद्धतीचा वापर करण्यास मानक कार्यपद्धती प्रोत्साहन देते. दिवसभर बॉक्स ऑफिसवर काउंटरवरची पुरेशी संख्या सुरू ठेवली जाईल आणि तिकीट खिडकीवर तिकीट विक्री चालू राहील आणि विक्री काउंटरवर गर्दी होऊ नये म्हणून आगाऊ बुकिंग करण्यासाठीही परवानगी देण्यात येईल. संपूर्ण आवार सार्वजनिक सेवांची ठिकाणे आणि मानवी संपर्कात येणारी सर्व ठिकाणे उदा. हँडल्स, रेलिंग इत्यादि निर्जंतुक करण्याची पद्धत ही मानक कार्यपद्धती सुनिश्चित करते आणि सिनेमाच्या प्रत्येक प्रदर्शनानंतर सभागृह निर्जंतुक केले जाईल असे ही त्यात म्हटले आहे.

Last Updated : Jan 31, 2021, 6:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.