ETV Bharat / city

कांदिवलीत पतंग पकडण्याच्या नादात शेणात पडून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू

कांदिवली पश्चिम येथील डहाणूकरवाडी भागातील तबेल्यात पतंग पकडण्याच्या नादात शेणात पडून 10 वर्षीय मुलाचा श्वास गुदमरून मृत्यू झाला आहे.

child
शेणात पडून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू
author img

By

Published : Jan 15, 2021, 7:13 PM IST

मुंबई - कांदिवली पश्चिम येथील डहाणूकरवाडी भागातील तबेल्यात पतंग पकडण्याच्या नादात शेणात पडून 10 वर्षीय मुलाचा श्वास गुदमरून मृत्यू झाला आहे. गुरुवारी दुपारी तीनच्या दरम्यान दुर्गेश जाधव हा पतंग पकडण्यासाठी घराजवळील तबेल्यात गेला असता तेथील शेणाच्या खड्ड्यात पडला व दलदलीत अडकल्याने श्वास गुदमरल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

पतंग पकडण्याच्या नादात शेणात पडून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू

हेही वाचा - VIDEO : लष्कर स्थापना दिनानिमित्त दिल्लीत परेड

कांदिवलीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबा साहेब साळुंखे यांच्या माहितीनुसार, 10 वर्षाचा दुर्गेश आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. दुर्गेशच्या घराशेजारी 5 स्टार डेरी नावाचा तबेला आहे. ज्यात पतंग पकडण्याच्या नादात दुर्गेशचा मृत्यू झाला. स्थानिकांच्या सूचनेनंतर पोलिसांनी क्रेनच्या मदतीने दुर्गेशला बाहेर काढले. परंतु, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा - राम कदमांचे वक्तव्य आधी आठवावे - सुनील केदार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.