ETV Bharat / city

पतंग पकडताना तुटली आयुष्याची दोर; खड्ड्यात पडून बालकाचा मृत्यू - dangerous kite playing for kids

पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून मुलाला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्या मुलाचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

सिन्नर येथील संत हरीबाबा नगरमध्ये पतंग उडविताना विहिरीत पडून एका मुलाचा मृत्यू झाला आहे,
बालकाचा मृतदेह काढताना कर्मचारी
author img

By

Published : Jan 15, 2021, 2:59 AM IST

मुंबई - राज्यात पतंगांच्या मांज्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटना ताज्या असतानाच गुरुवारी सायंकाळी कांदिवली येथे पतंग पकडताना शेणाच्या खड्ड्यात पडून दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. दुर्गेश जाधव असे मृताचे नाव आहे.

गुरुवारी (१४ जानेवारी) सायंकाळी साडेचार वाजता कांदिवली पश्चिम येथे (फाईव्ह स्टार डेअरीजवळ, आर्या वुमन हॉस्पिटल समोर, ढाणुकरवाडी, महात्मा गांधी रोड) शेण साठवण्याच्या खड्ड्यात मुलगा पडल्याची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून मुलाला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्या मुलाचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पतंग पकडण्यासाठी धावत असताना तो खड्ड्यात पडल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा-विशेष : प्लास्टिक पतंग अन् नायलॉन मांजामुळे पक्ष्यांच्या जीवितास धोक्याबरोबर प्रदूषणात वाढ

सणादिवशी पंतग खेळत असताना मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पंतग उडविताना उंच इमारतीच्या ठिकाणी अथवा मोकळ्या मैदानातही जीवाला कोणताही अपाय होणार नाही, याची काळजी घेणे गरज व्यक्त होत आहे.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे पतंग उडविताना विहिरीत पडून मुलाचा मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.