ETV Bharat / city

गोरेगावात मुसळधार पावसामुळे घराच्या सीलिंगचे प्लास्टर पडून मुलाचा मृत्यू - अपघातात एका मुलाचा मृत्यू

मुंबईत गेल्या २० दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारपासून मुंबईत हजेरी लावली आहे. या पावसामुळे गोरेगाव येथील एका घराच्या स्लॅबचे प्लास्टर पडून आई आणि मुलगा जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता मुलाचा मृत्यू झाला असून आईची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

सीलिंगचे प्लास्टर पडून मुलाचा मृत्यू
सीलिंगचे प्लास्टर पडून मुलाचा मृत्यू
author img

By

Published : Jul 9, 2021, 3:52 PM IST

मुंबई - मुंबईत गेल्या २० दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारपासून मुंबईत हजेरी लावली आहे. या पावसामुळे गोरेगाव येथील एका घराच्या स्लॅबचे प्लास्टर पडून आई आणि मुलगा जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता मुलाचा मृत्यू झाला असून आईची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

पावसाची हजेरी -
मुंबईत जूनच्या सुरुवातीचे काही दिवस पाऊस पडला, त्यानंतर सुमारे २० दिवसाहून अधिक काळ पावसाने दडी मारली होती. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार (8 जुलै) गुरुवारपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली. आज सकाळपर्यंत २४ तासात मुंबई शहर विभागात ४३.७८, पूर्व उपनगरात ५८.०५, पश्चिम उपनगरात ३३.४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसादरम्यान शहरात ४, पूर्व उपनगरात ४ व पश्चिम उपनगरात ३ अशा एकूण ११ ठिकाणी शॉर्टसर्किट होण्याच्या घटना घडल्या. शहरात ३, पूर्व उपनगरात २ व पश्चिम उपनगरात १ अशा एकूण ६ ठिकाणी झाडांच्या फांद्या पडण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

एका मुलाचा मृत्यू -
पावसामुळे शहरात १ आणि पश्चिम उपनगरात २ अशा एकूण ३ ठिकाणी घराच्या भिंतीचा भाग पडण्याच्या तक्रारी पालकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडे प्राप्त झाल्या. गोरेगाव पश्चिम येथील राम मंदिराजवळ असलेल्या न्यू अमन इमारतीमधील खोली क्रमांक ७१२ च्या सिलिंगच्या प्लास्टरचा भाग पडून त्यात आई आणि मुलगा असे दोन जण जखमी झाले. जखमींना उपचारार्थ कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता आज सकाळी ५.२० वाजता रुग्णालयातून प्राप्त माहितीनुसार जखमींपैकी अरसलन अन्सारी, वय ८ वर्षे या मुलाचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. तर फायमिदा अन्सारी, वय ३६ वर्षे यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

हेही वाचा - शंभर कोटी वसुली प्रकरण; ईडी सचिन वाझेचा नोंदवणार जबाब

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.