ETV Bharat / city

मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल बातमी

मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. जवळपास दहा मिनिटे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात ही भेट झाली.

chief-minister-wished-the-governor-a-happy-birthday
मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
author img

By

Published : Jun 17, 2021, 3:58 PM IST

मुंबई - महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा आज वाढदिवसा निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची राजभवनावर जाऊन भेट घेतली. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह हे देखील उपस्थित होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वाढदिवसानिमित्त आज दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतली. जवळपास दहा मिनिटे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात ही भेट झाली. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या वाढदिवसाला निमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या.

राज्यपालांची भेट घेऊन हा संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न?

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासूनच राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात अनेक मुद्द्यांवरून संघर्ष पाहायला मिळाले आहेत. खास करून 12 नामनिर्देश सदस्यांवरून अजूनही राज्यपालांनी निर्णय घेतलेला नाही. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान देखील हा मुद्दा उपस्थित केला होता. यासोबतच अनेक मुद्द्यांवरून मुख्यमंत्री विरुद्ध राज्यपाल असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यपालांची भेट घेऊन हा संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात केली जात आहे.

देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यपालांना दिल्या शुभेच्छा -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेण्या अगोदर राज्याचे विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यपालांना शुभेच्छाही दिल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.