ETV Bharat / city

Rajya Sabha election 2022 : महाविकास आघाडीचे चारही उमेदवार जिंकणार - मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री अजित पवार

दहा जूनला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी ( Rajya Sabha Election 2022 ) महाविकास आघाडीच्या ( Mahavikas Aghadi ) नेत्यांनी बैठकीचे आयोजन केले होते. राज्यसभा निवडणुकीत कोणी कितीही ताकद लावली तरी, महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील, असा दावा या बैठकीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी केला आहे.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Jun 8, 2022, 12:03 PM IST

Updated : Jun 8, 2022, 12:58 PM IST

मुंबई - दहा जूनला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी ( Rajya Sabha Election 2022 ) महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठकीचे आयोजन केले होते. राज्यसभा निवडणुकीत कोणी कितीही ताकद लावली तरी, महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील, असा दावा या बैठकीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी केला आहे. मात्र, मतदान करताना सर्वच आमदारांनी मतदान बाद होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी सूचनाही सर्व आमदारांना मुख्यमंत्र्यांनी केली आहेत.

बोलताना मुख्यमंत्री

मुंबईतील एका हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची ही बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा निवडणूक निरीक्षक मल्लिकार्जुन खर्गे, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, यांच्यासह तिन्ही पक्षाचे सर्व आमदार मंत्री आणि ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते. आजच्या या बैठकीला तेजस ठाकरे हे देखील उपस्थित होते.

राजकारणात सभ्यता असायला हवी - शेवटची राज्यसभा निवडणूक केव्हा झाली होती हे आठवतही नाही. सामंजस्याने राज्यसभा निवडणूक बिनविरोध पार पडत होती. मात्र, जवळपास 22 वर्षांनी राज्यांमध्ये राज्यसभा निवडणूक होत आहे. एक राजकीय परंपरा पाळायला हवी होती. राजकारण आणि सभ्यता या सध्या परस्पर विरोधी आहेत. असे असल तरी, राजकारणात सभ्यता असायला हवी असे नाव न घेता भारतीय जनता पक्षाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला आहे. ही निवडणूकही बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीने प्रयत्न केले होते. याबाबतचा प्रस्ताव महाविकास आघाडीकडून देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला होता. मात्र, हा प्रस्ताव भारतीय जनता पक्षाकडून नाकारण्यात आल्यामुळे 22 वर्षानंतर राज्यांमध्ये राज्यसभा निवडणूक होत आहे.

दहा तारखेला विजयाची तयारी - दहा जूनला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय होणार आहे. 10 जूनला विजयाची तयारी करा, असे संकेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिले आहेत. बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांची संवाद साधत विजय महाविकास आघाडीचा तर होईल, असे स्पष्ट केल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

महाविकास आघाडी करणार जल्लोष साजरा - आधी राज्यसभा आणि त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुका जिंकून महाविकास आघाडीत जल्लोष साजरी करणार, असा विश्‍वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला. या बैठकीला काही अपक्ष आमदार वैयक्तिक कारणास्तव गैरहजर होते. मात्र, महा विकास आघाडीचे चारही खासदार निवडून येतील, असा दावा विनायक राऊत यांनीही केला आहे.

हेही वाचा - Rajya Sabha Election 2022 : लवकरच दुसरी बैठक घेण्यात येईल - पृथ्वीराज चव्हाण

Last Updated : Jun 8, 2022, 12:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.