ETV Bharat / city

'त्या' वेळी माझ्यावरही दडपण होते, पण मी खचलो नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - मुख्यमंत्री उद्धव ठकरे बातमी

टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनद्वारे आयोजित 'पत्रकार कोव्हिड योद्धा' पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.

cm
cm
author img

By

Published : Dec 24, 2020, 9:56 PM IST

मुंबई - मला प्रशासनाचा अनुभव नव्हता. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात मी मीडियाच्या माध्यमातून जगभरातील स्थिती पाहत होतो. मीडियातील बातम्यांवरून कोरोना संकटाचा अंदाज आला. लष्कर मागवावे लागते की काय असा प्रश्न मनात येत होता. सुरुवातीच्या काळात माझ्यावरही दडपण होते. पण, मी खचलो नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनद्वारे आयोजित 'पत्रकार कोव्हिड योद्धा' पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी बोलताना, मार्चमध्ये मुंबई, पुण्याला आपल्याकडे कोरोनाचे रुग्ण सापडले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मला माहिती यायला सुरुवात झाली की, रुग्ण वाढत आहेत.मेडिकल हॉस्पिटलची कमतरता कमी जाणवत होती. रुग्णालयांची गरज पडणार अस वाटलं. त्यामुळे हॉस्पिटलची व्यवस्था वाढवली. आपण कोरोनावर उपचार करणारे देशातच पहिलं हॉस्पिटल उभारलं. टास्क फोर्स सुरु केला असे मुख्यमंत्री म्हणाले.कोरोनाच्या सुरुवातीला मी सर्वांना सांगत होतो की घराबाहेर पडू नका. त्याकाळात मीसुद्धा कमीत कमी वेळा घराबाहेर पडलो. त्यावरुन माझ्यावर टीका देखील झाली. पण पहिले दोन महिने आम्ही सगळेजण पहाटेपर्यंत जागी असायचो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व ठिकाणांचा आढावा घेत होतो.

पत्रकारांनाही कोरोनाची लागण -

कोरोनाकाळात अनेक पत्रकारांनाही कोरोनाची लागण झाली. रुग्णालय कमी पडत होते, रुग्णवाहिकांचा तुटवडा होता, डॉक्टर्स नव्हते, औषध तर अजूनही आलेलं नाही, पीपीई किट नाही, एन-95 मास्क नाही, एकदम तारांबळ उडाली होती. पण सुदैवाने कोविड योद्धे म्हणून तुम्ही तुमचं कर्तव्य बजावत आलात, जे वास्तव आहे ते जनतेपर्यंत आणि आमच्यापर्यंत पोहोचवत आलात. तसेच आपले पोलीस, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवी संस्था यांनी चांगले काम केले असे गौरवउद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.

तेव्हा केंद्राने ऐकले नाही -

लॉकडाऊन सुरु होण्याआधी मी 17 मार्चपासून केंद्र सरकारला सतत बोलत होतो की, तुम्ही आम्हाला ट्रेन्स द्या. आम्ही पैसे देतो. आमच्याकडे असलेले मजूर त्यांना आम्ही थांबवू शकत नाही. त्यांना जोरजबरदस्ती करुन थोपवू शकत नाही. एकेक खोलीत 8 ते 10 लोक राहायची, त्यांना किती आपण सुविधा देणार, हे थांबू शकत नाही. त्यांना जायची परवानगी द्या. पण ते नाही म्हटले. शेवटी व्हायचं तेच झालं. ज्याकाळात आपण त्यांना जाऊ द्यायला हवं होतं तेव्हा आपण त्यांना थांबवलं. त्यानंतर जेव्हा जाऊ द्यायला नको होतं तेव्हा जाऊ द्यावं लागलं. कारण पर्यायच राहिला नाही. मग हे मजूर एकेक ठिकाणी होते, ते पसरायला लागले. शेवटी राज्यभरात त्यांना थोपवून आपल्याला त्यांची सोय करावी लागली. ठिकठिकाण छावण्या काढाव्या लागल्या. सहा ते सात लाख मजुरांची किमान एक महिना तरी सोय केली.

आपली साथ महत्वाची -

या सर्व काळात एक प्रश्न मला भेडसावत होता, तो म्हणजे मानसिक संतुलन बिघडत होते. या सर्व काळात माझ्या मनावरही प्रचंड दडपण होतं. पण जर मी खचलो असतो तर काय? हा एक मुद्दा होता. शेवटी लढणं आहेच, लढण्याशिवाय पर्याय नाही. हार मानणं तर शक्य नाही. मोठी जबाबदारी आहे. लढण्याशिवाय आपण त्यातून बाहेर पडू शकत नाही. सोबतील सर्वजण आहेत, हा जेव्हा विचार येतो तेव्हा लढायला बळ येतं. मीदेखील तेच ठरवलं. आपणदेखील एकमेकांच्या सोबत आहोत. कोरोना साथ असली तरी आपली सगळ्यांची साथ महत्त्वाची आहे. या साथीवर मात करणारी आपली साथ महत्त्वाची आहे. कोरोनाचा काळ अजून संपलेला नाही. सुरक्षित अंतर ठेवण्याची गरज आहे. आता फक्त मास्क हेच शस्त्र आपल्या हातात आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा - 1 जानेवारीपासून देशातील सर्व टोल नाक्यांवर FASTag अनिवार्य

हेही वाचा - फडणवीसांसह घेणार केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट, गिरीश महाजनांचे अण्णा हजारेंना आश्वासन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.