ETV Bharat / city

Mission 200 Incomplete : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील मुख्यमंत्र्यांचे मिशन 200 अपूर्ण, चंद्रकांत पाटलांचाही दावा ठरला फोल - Deputy CM devendra fadnavis

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी द्रोपदी मुर्मू याना २०० आमदारांच्या मतांचा केलेला दावा फोल ठरला आहे. महाराष्ट्रात एकूण २८३ आमदारांनी मतदान केले. त्यापैकी द्रोपदी मुर्मू यांना १८१ मते मिळाली म्हणजेच त्यांचे मतमूल्य ३१,६७५ इतके होते. तर यशवंत सिन्हा यांना ९८ मते मिळाली त्यांचे मत मूल्य १७१५० इतके आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांनी ७० टक्के आमदारांची मते आम्हाला भेटतील असेही सांगितलं होते, त्यांचाही दावा खोटा ठरला आहे.

Draupadi Murmu
द्रोपदी मुर्मू
author img

By

Published : Jul 22, 2022, 10:32 AM IST

मुंबई - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी द्रोपदी मुर्मू याना २०० आमदारांच्या मतांचा केलेला दावा फोल ठरला असून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांनी ७० टक्के आमदारांची मते आम्हाला भेटतील असेही सांगितलं होते, त्यांचाही दावा खोटा ठरला आहे. महाराष्ट्रातून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतांची फाटा फूट झाली नसल्याचं समोर आले आहे.

महाराष्ट्रात मतांची फाटाफूट नाही- एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू ( Draupadi Murmu ) यांच्या उमेदवारीला भाजप बरोबर शिवसेनेच्या दोन्ही गटांचा पाठिंबा ( Shiv Sena and BJP Support ) होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नाराजीमुळे द्रौपदी मुर्मू यांना २०० आमदारांचा पाठिंबा मिळेल, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. तर मागे झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस ( Deputy CM devendra fadnavis ) यांनी जो चमत्कार करून दाखवला होता, त्या अनुषंगाने या मतदानामध्ये ७९ टक्के मतं आम्हाला भेटतील असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. परंतु राज्यात आमदारांच्या मतदानात फाटाफूट झालेली नाही. द्रोपदी मुर्मू यांना १८१ तर विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांना राज्यातून ९८ मते मिळाली आहेत. शिंदे सरकारला १६५ आमदारांचा पाठिंबा आहे. शिवसेनेच्या पाठिंबामुळे १५ मते वाढली होती. तसेच शिवसेनेबरोबर असलेल्या एका आमदाराचा पाठिंबा होता. भाजप आणि शिंदे गटाचा प्रत्येकी एक आमदार या निवडणुकीत गैरहजर होता.

महाराष्ट्रातून ४ मते अवैध - महाराष्ट्रात एकूण २८३ आमदारांनी मतदान केले. त्यापैकी द्रोपदी मुर्मू यांना १८१ मते म्हणजेच त्यांचे मतमूल्य ३१,६७५ इतके होते. तर यशवंत सिन्हा यांना ९८ मते मिळाली त्यांचे मत मूल्य १७१५० इतके आहे. महाराष्ट्रातून ४ मते अवैध ठरली असून त्यांचे मत मूल्य ७०० आहे.

फाटाफूट का नाही, यावर मुख्यमंत्र्यांची चुप्पी? - राष्ट्रवादी काँग्रेसचे ५१ तर काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. यशवंत सिन्हा यांना ९८ मते मिळाली आहेत. विश्वास दर्शक ठरावाच्या वेळी विरोधात ९९ मते मिळाली होती. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाच्या असल्याने या समाजातील विरोधी बाकावरील आमदारांना पाठिंबा देण्याचे आवाहन सत्ताधाऱ्यांनी केले होते. तरीही राज्यात मतांची फटाफट झालेली नाही. या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिशन २०० ची घोषणा अपूर्ण का राहिली असे विचारले असता, महाराष्ट्रातून भरपूर मते मिळाली आहेत, द्रोपदी मुर्मू विक्रमी मते घेऊन निवडून आल्या आहेत. एवढेच त्यांनी सांगितलं, परंतु मतांची फाटाफूट का झाली नाही? हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.

मुर्मू यांना देशातील पहिल्या आदिवासी राष्ट्रपती- भारताच्या १५ व्या राष्ट्रपती ( 15th President Of India ) म्हणून द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली ( Draupadi Murmu Elected As President Of India ) आहे. विरोधी यशवंत सिन्हा यांचा पराभव झाला ( Yashwant Sinha Loses Presidential Battle ) आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली होती. मुर्मू यांच्या विरोधात विरोधी पक्षांकडून माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांना उभे केले होते. 18 जुलैला या पदासाठी निवडणूक पार पडली. विजयी झाल्याने मुर्मू यांना देशातील पहिल्या आदिवासी राष्ट्रपती झाल्या आहेत.

हेही वाचा - Droupadi Murmu Become President : द्रौपदी मुर्मू विजयी, मोदी-शाह जोडी पुन्हा हीट, एनडीएच्या बाहेरचीही मते मिळाली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.