ETV Bharat / city

CM Eknath Shinde Group : शिंदे गटातील निम्म्याहून अधिक आमदारांचे भवितव्य पणाला

शिवसेनेचे बंडखोर नेते, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या गटात सहभागी झालेल्या अर्धाहुन अधिक आमदारांना ( Shiv Sena rebel MLA ) आगामी निवडणुकीत झगडावे लागणार आहे शिवसेनेने आपली ताकद काढून घेतली तर या आमदारांचा विजय सोपा असणार नाही.

Eklnath Shinde Group
शिंदे गटातील निम्म्याहून अधिक आमदारांचे भवितव्य पणाला
author img

By

Published : Jul 9, 2022, 5:38 PM IST

मुंबई - राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी महाविकास आघाडीतून ( Mahavikas Aghadi ) बाहेर पडत भाजपशी घरोबा केला. शिवसेना भाजपाची नैसर्गिक ( Shiv Sena BJP Group ) युती आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तसेच आमदारांना निधी मिळत नसल्याच्या मुद्द्यावर आम्ही बाहेर पडत आहोत असं सांगत महाराष्ट्रात नवी सत्ता स्थापन करण्यात आली. ही सत्ता स्थापन झाल्यानंतर आता आमदारांच्या पात्र-अपात्रतेसंबंधीचा निर्णय लवकरच सर्वोच्च न्यायालयात ( Supreme Court ) घेतला जाणार आहे. याबाबत शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका ( Shiv Sena filed petition in Supreme Court ) दाखल करत बंडखोर आमदारांच्या पात्रतेलाच आव्हान दिले आहे. जर या बंडखोर आमदारांची पात्रता ( Eligibility of rebel MLA) रद्द करण्यात आली तर, या आमदारांना निवडणुकीला नव्याने सामोरे जावे लागणार आहे. तसे झाल्यास स्वतःच्या बळावर किती आमदार जिंकून येऊ शकतात याबाबत अनिश्चितताच आहे. निवडणुका झाल्या तर, आगामी निवडणुकांना सामोरे जाताना कोणत्या आमदारांची दमछाक होणार आहे जाणून घेऊया.

अतिशय कमी मतांनी जिंकलेले उमेदवार - 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ( Assembly elections 2019 ) शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढवलेल्या काही आमदारांना अतिशय कमी मताधिक्य मिळाले आहे. या आमदारांची स्वतःची ताकद आणि शिवसेनेची ताकद मिळून त्यांना विजय प्राप्त करता आला आहे. यापैकी 5 हजार मतांपेक्षा कमी मतांच्या फरकांनी विजयी झालेल्या उमेदवारांना आगामी निवडणूक निश्चितच जड जाणार आहे. कोरेगाव मतदार संघातील महेश शिंदे ( Mahesh Shinde ) यांना केवळ सहा हजार दोनशे मतांची आघाडी मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर त्यांनी विजय संपादन केला होता. काय झाडी काय डोंगर या डायलॉगमुळे चर्चेत आलेले शहाजी पाटील ( MLA Shahaji Patil ) या सांगोल्यातील आमदारांनी केवळ 768 मताधिक्यने अनिकेत देशमुख यांच्यावर विजय मिळवला होता. मुंबईतील चांदीवली मतदार संघातील दिलीप लांडे यांनी काँग्रेसच्या नसीम खान यांच्यावर केवळ 405 मतांनी विजय मिळवला होता. तर, पाचोरा विधानसभा मतदारसंघातील किशोर आप्पा पाटील यांनी अमोल शिंदे यांच्यावर केवळ दोन हजार मतांनी विजय मिळवला होता.

पंधरा हजारापेक्षा कमी मताधिक्य असलेले आमदार - पाटण मतदारसंघातील माजी मंत्री शंभूराज देसाई यांनी सत्यजित पाटणकर यांच्यावर केवळ 14 हजार मतांनी विजय मिळवला होता. तर, संदिपान भुमरे हे दुसरे मंत्री यांनी पैठण मतदार संघातून दत्तात्रय गोरडे यांच्यावर केवळ 14 हजार मतांनी विजय मिळवला होता. नांदेड उत्तर मतदार संघातील बालाजी कल्याणकर यांनी काँग्रेसचे डीपी सावंत यांच्यावर बारा हजार मतांनी विजय मिळवला होता. औरंगाबाद मतदार संघातील आमदार प्रदीप जयस्वाल यांनी नसिरुद्दीन सिद्दीकी यांच्यावर केवळ 13 हजार मतांनी विजय मिळवला होता. नांदगाव मतदार संघातील सुहास कांदे यांनी राष्ट्रवादीचे पंकज भुजबळ यांच्यावर 13 हजार 800 मतांनी विजय मिळवला होता. तर, दापोली मतदारसंघातून योगेश कदम यांनी राष्ट्रवादीच्या संजय कदम यांच्यावर केवळ 13 हजापर 500 मतांनी विजय मिळवला होता. सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केसरकर यांनी राजन तेली यांच्यावर केवळ तेरा हजार मतांनी विजय मिळवत त्यांना चितपट केले होते.

वीस हजाराहून कमी मताधिक्य असलेले उमेदवार - कोणत्याही विधानसभा निवडणुकीत वीस हजारांपेक्षा कमी मताधिक्य असेल तर आगामी निवडणुकीत अशा आमदाराला कसून तयारी करावी लागते. मात्र, शिंदे गटातील आमदारांना आता स्वबळावरच निवडणूक लढवावी लागणार असल्याने त्यांची अधिक कसोटी लागणार आहे. यामध्ये काही मतदारसंघातून सदा सर्वणकर यांनी मनसेच्या संदीप देशपांडे यांच्यावर 18 हजार मतांनी विजय मिळवला होता. तर, भायखळा मतदार संघातून यामिनी जाधव यांनी वारीस पठाण यांच्यावर वीस हजार मतांनी विजय मिळवला होता. तसेच चोपडा मतदारसंघातून लता सोनावणे यांनी जगदीश वळवी यांच्यावर वीस हजार मतांनी, एरंडोल मतदारसंघातून चिमण पाटील यांनी राष्ट्रवादीच्या सतीश पाटील यांच्यावर अठरा हजार मतांनी विजय मिळवला होता. कळमनुरी मतदार संघातून संतोष बांगर यांनी अमित मगर यांच्यावर 16 हजार मतांनी विजय मिळवला होता. तर, राधानगरी मतदारसंघातून प्रकाश आबिटकर यांनी शिवाजी पाटील यांच्यावर अठरा हजार मतांनी विजय मिळवला होता. तसेच कर्जत मतदारसंघातून महेंद्र थोरवे यांनी सुरेश लाड यांच्यावर अठरा हजार मतांनी विजय मिळवला होता. तर, महाड मतदार संघातून भरत गोगावले यांनी माणिक जगताप यांच्यावर केवळ एकवीस हजार मतांनी विजय मिळवला होता. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या आमदारांना विजयासाठी कडवी झुंज द्यावी लागणार हे निश्चित.

हेही वाचा - Devendra Fadnavis : शिवसेनेचे किती खासदार संपर्कात?, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.