ETV Bharat / city

CM Eknath Shinde letter To Governor : महाविकास आघाडी सरकारने पाठवलेल्या 'त्या' १२ आमदारांचा पत्ता कट; मुख्यमंत्री राज्यपालांना देणार नवीन यादी - CM Eknath Shinde letter To Governor

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे chief minister eknath shinde यांनी राज्यपालांना पत्र लिहून महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली १२ आमदारांची यादी रद्द करण्याची विनंती केली आहे. उद्धव ठाकरे सरकार Uddhav Thackeray Govt अस्तित्वात असताना त्यांनी राज्यपालांकडे विधान परिषदेसाठी legislative council in maharashtra १२ आमदारांची यादी पाठवली होती. परंतु राज्यपालांनी यादीवर Governor Bhagat Singh Koshyari स्वाक्षरी न केल्याने वाद झाला होता.

CM Eknath Shinde
Etv Bharatमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
author img

By

Published : Sep 3, 2022, 10:37 AM IST

Updated : Sep 3, 2022, 1:59 PM IST

मुंबई - उद्धव ठाकरे सरकार Uddhav Thackeray Govt अस्तित्वात असताना त्यांनी राज्यपालांकडे विधान परिषदेसाठी legislative council in maharashtra १२ आमदारांची यादी पाठवली होती. परंतु दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही त्या यादीवर राज्यपालांनी Governor Bhagat Singh Koshyari स्वाक्षरी न केल्याने हा वाद शिगेला पोचला होता. उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी सुद्धा राज्यपालांना टोला लगावला होता. परंतु आता सरकारच बदलले असल्याकारणाने, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे chief minister eknath shinde यांनी राज्यपालांना पत्र लिहून महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली यादी रद्द करण्याची विनंती केली आहे.

लवकरच नवीन १२ आमदारांची यादी? राज्यात शिंदे फडवणीस सरकार Shinde Fadwanis Govt सत्तेत आल्यानंतर सर्व समीकरण बदलून गेली आहेत. राज्यात झालेल्या या सत्तांतर नाट्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारच्या Maha Vikas Aghadi Govt काळात राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीवरून शिगेला पोहचलेला संघर्ष आता कायमचा शांत झाला आहे. कारण महाविकास आघाडी सरकारने दिलेली १२ नावांची यादी रद्द करण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केली आहे. त्याचबरोबर शिंदे- फडणवीस सरकार मधील विधान परिषदेसाठी नवीन १२ नावांची यादी लवकरच ते राज्यपालांना पाठवणार असल्याचेही सांगितलं गेलं आहे.

१२ नावांची यादी रद्द करण्याची विनंती - महाविकास आघाडी सरकारने दिलेली १२ नावांची यादी शेवटपर्यंत राज्यपालांनी राखून ठेवली होती. त्यावरून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना टोलासुद्धा लगावला होता. परंतु आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पत्र लिहून ती १२ नावांची यादी रद्द करण्याची विनंती केली आहे. त्याचबरोबर लवकरच शिंदे - फडणवीस सरकार नवीन १२ आमदारांची यादी राज्यपालांकडे देणार असून राज्यपाल त्यावर त्वरित निर्णय घेतील अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. कारण यापूर्वीचा इतिहास बघता शिंदे - फडणवीस सरकारसाठी राज्यपाल हे महत्त्वाचा दुवा ठरणार आहेत अशी चर्चाही रंगली आहे.

शिंदे गटाकडून चर्चेत असलेली नावे? या १२ आमदारांमध्ये भाजपचे ८ व शिंदे गटाचे ४ आमदार असणार आहेत. शिंदे गटाकडून रामदास कदम, विजय शिवतारे, आनंदराव अडसूळ, अभिजीत अडसूळ, अर्जुन खोतकर, नरेश म्हस्के, चंद्रकांत रघुवंशी या नावांची चर्चा आहे.

भाजपकडून चर्चेत असलेली नावे? भाजपकडून नुकतेच अपघातात निधन पावलेले शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे, हर्षवर्धन पाटील, पंकजा मुंडे, कृपाशंकर सिंह, चित्रा वाघ, गणेश हाके, सुधाकर भालेराव यांच्या नावांची चर्चा आहे.

हेही वाचा - JDU MLA Join BJP : नितीशकुमारांना धक्का; मणिपूरमधील JDU चे पाच आमदार भाजपमध्ये दाखल

Last Updated : Sep 3, 2022, 1:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.