ETV Bharat / city

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात रात्री उशिरा मंत्रिमंडळ खातेवाटपाबाबत चर्चा

author img

By

Published : Jul 2, 2022, 10:38 AM IST

Updated : Jul 2, 2022, 12:50 PM IST

राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन रविवार 3 जुलै व सोमवार 4 जुलै, असे दोन दिवस होत आहे. यामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबरोबरच बहुमत चाचणीही होणार आहे. त्यानंतर लवकरच आठवड्याभरामध्ये मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. त्या कारणास्तव आता खातेवाटप व मंत्र्यांची नावे यावरून भाजप व एकनाथ शिंदे गटामध्ये हालचालींना वेग आलेला आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झालेली भेट अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.

छायाचित्र
छायाचित्र

मुंबई - राज्यात बंडखोर नेते एकनाथ शिंदे व भाजप यांचे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आता खाते वाटपावरून चर्चा रंगू लागलेल्या आहेत. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाला किती मंत्रीपद त्याच बरोबर भाजपला किती मंत्रीपद देण्यात यावीत याबाबत शुक्रवारी (दि. 1 जुलै) रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या अग्रदूत या निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनी भेट देऊन याविषयी सविस्तर चर्चा केल्याची माहिती पुढे येत आहे.

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर आता मंत्रिमंडळाचे गठन लवकरच करण्यात येणार आहे. याबाबत दोन्ही बाजूंच्या आमदारांना मंत्रीपद दिली जाणार आहेत. परंतु ही मंत्रीपद देत असताना खाते वाटपाबाबत मात्र अजूनही घोळ सुरू आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन जवळपास दीड तास या विषयावर चर्चा केल्याची माहिती पुढे आली आहे. दोन दिवसांपूर्वी संपूर्ण भाजपला नाही तर राजकीय वर्तुळात मोठा धक्का खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी देत मुख्यमंत्री म्हणून बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे नाव जाहीर केले होते. आता नवीन मंत्रिमंडळ स्थापन होत असताना एकनाथ शिंदे यांच्या गटाला किती मंत्री पद व कुठली खाती दिली जातात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. त्याचबरोबर अपक्ष व समर्थक असलेल्या आमदारांना सुद्धा दोन्ही बाजूंकडून मंत्रीपद दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

2019 मध्ये शिवसेनेकडे ही कॅबिनेट खाती - महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेकडे उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा. नगर विकास सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), उच्च व तंत्र शिक्षण, कृषी, माजी सैनिक कल्याण, वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, पाणीपुरवठा व स्वच्छता रोजगार हमी, फलोत्पादन, परिवहन, संसदीय कार्य, जलसंधारण, पर्यटन, पर्यावरण राज्य शिष्टाचार ही कॅबिनेट खाती होती.

शिवसेनेकडे राज्यमंत्रीपद - महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमीन, गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास उद्योजकता, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन ही खाती होती.

या बंडखोर आमदारांची लागू शकते कॅबिनेट पदी वर्णी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, शंभूराजे देसाई, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकर, भरत गोगावले या नेत्यांची कॅबिनेट मंत्रिपदावर वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे.

भाजपकडून हे आमदार मंत्रिपदाचा शर्यतीत - दुसरीकडे उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीममध्ये चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर, सुभाष देशमुख, गणेश नाईक, राधाकृष्ण विखे पाटील, संजय कुटे, मंगल प्रभात लोढा, संभाजी पाटील निलंगेकर, रवींद्र चव्हाण, डॉ. अशोक उईके, सुरेश खाडे, जयकुमार रावल, देवयानी फरांदे, माधुरी मिसाळ या नेत्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दोन दिवसाचे विशेष अधिवेशन - राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन रविवार 3 जुलै व सोमवार 4 जुलै, असे दोन दिवस होत आहे. यामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबरोबरच बहुमत चाचणीही होणार आहे. त्यानंतर लवकरच आठवड्याभरामध्ये मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. त्या कारणास्तव आता खातेवाटप व मंत्र्यांची नावे यावरून भाजप व एकनाथ शिंदे गटामध्ये हालचालींना वेग आलेला आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झालेली भेट अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.

हेही वाचा - Devendra Fadnavis : घोटाळे बाजांवर कारवाई झालीच पाहिजे; किरीट सोमय्या यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

Last Updated : Jul 2, 2022, 12:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.