ETV Bharat / city

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटींची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा - देवेंद्र फडणवीस घोषणा

नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दहा हजार कोटी रुपये मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच संबंधित मदतीची रक्कम थेट शेतकऱयांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

ओला दुष्काळग्रस्तांसाठी दहा हजार कोटींची मदत ; मुख्यमंत्र्यांची घोषणा
author img

By

Published : Nov 2, 2019, 2:58 PM IST

Updated : Nov 2, 2019, 3:27 PM IST

मुंबई - नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत ओल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दहा हजार कोटी रुपये मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच संबंधित मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सब कमिटीची बैठक पार पडली. यावेळी सरकारकडून तत्काळ दहा हजार कोटींची मदत जाहीर करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच प्रशासनाकडून नुकसानीचा पंचनामा न होऊ शकलेल्या शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीचा फोटो काढून पाठवल्यासही ते ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

यंदा लांबलेल्या परतीच्या पावसामुळे राज्यभरात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासंदर्भात विविध ठिकाणी पंचनामे करण्याच्या प्रक्रिया चालू असून, यामधील अडचणी टाळण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ देण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

परंतु, यासंबंधी फक्त घोषणा करण्यात आली असून, शासन निर्णय काढण्याबाबत सरकारने कोणतेही स्पष्टीकरण न दिल्याने संदिग्धता कायम आहे. तसेच केंद्र सरकारकडून लवकरात लवकर मदत मिळवणार असून, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे ते म्हणाले.

Intro:महादेव जानकर-

- बैठकी मध्ये दहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी देण्यात आलेले आहेत किंवा अवेळी पावसामुळे नुकसान झाले त्या सर्वांना देण्यासंदर्भात मुख्यमंत्री यांनी निर्देश दिले आहेत.. पंचनामा साठी अडचणी येऊ नयेत यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ देण्यात येणार आहे

राजकीय विषयावर किंवा सत्ता स्थापनेबाबत कोणतीही चर्चा झाली नाही महादेव जानकर

नैसर्गिक आपत्ती असल्यास काळजीवाहू सरकारला अशा पद्धतीची बैठक घेऊन निर्णय घेता येतो

उपसमितीतील मंत्री करणार दुष्काळ दौऱ्याची पाहणी

शिवसेनेचे नेते मुंबईबाहेर होते त्याच्यामुळे येऊ शकले नाहीत, फक्त विजय शिवतारे उपस्थित होते.....Body:मConclusion:बाईट कॅमेरा मॅन सरांनी पाठवला आहे
Last Updated : Nov 2, 2019, 3:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.