ETV Bharat / city

जागतिक महिला दिनानिमित्त सीएसएमटी इमारतीला विद्युत रोषणाई

जागतिक महिला दिनी आपापल्या पद्धतीने महिलांप्रति आदर व्यक्त करतात. यानिमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचंही आयोजन केले जाते. छत्रपती शिवाजी टर्मिनस इमारतीला देखील दरवर्षी 8 मार्च निमित्त आकर्षक रोषणाई केली जाते.

सीएसएमटी इमारतीला विद्युत रोषणाई
सीएसएमटी इमारतीला विद्युत रोषणाई
author img

By

Published : Mar 8, 2021, 9:01 AM IST

मुंबई - जागतिक महिला दिनाच्या औचित्याने ऐतिहासिक वास्तू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीला गुलाबी रंगाची रोषणाई करण्यात आली आहे. या रोषणाईच्या माध्यमातून रेल्वेकडून समस्त महिलांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या विद्युत रोषणाईने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

जागतिक महिला दिन दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जातो. महिलांना त्यांच्या अधिकारांविषयी जागरुक करणे हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे. आपल्या घरापासून ते देशाच्या विकासामध्येही महिलांचे मोठे योगदान आहे. या दिवशी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने महिलांप्रति आदर व्यक्त करतात. यानिमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचंही आयोजन केले जाते. छत्रपती शिवाजी टर्मिनस इमारतीला देखील दरवर्षी 8 मार्च निमित्त आकर्षक रोषणाई केली जाते.

सीएसएमटी इमारतीला विद्युत रोषणाई
सीएसएमटी इमारतीला विद्युत रोषणाई
महिला दिनाविषयी थोडक्यातभारतात मुंबई येथे ८ मार्च हा पहिला महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालयांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.