ETV Bharat / city

कोरेगाव भीमा एल्गार परिषद प्रकरणी एनआयएकडून आरोपपत्र दाखल - कोरेगाव भीमा प्रकरणी एनआयएकडून आरोपपत्र दाखल

कोरेगाव भीमा एल्गार परिषद प्रकरणी पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यातील शनिवारवाडा येथे कबीर कला मंचकडून कार्यक्रम करण्यात आला होता. या वेळेस वेगवेगळ्या व्यक्तींकडून प्रक्षोभक भाषणे करण्यात आली होती. त्याची परिणती दुसऱ्या दिवशी दंगलीत झाली होती. या अगोदर पुणे पोलिसांकडून यासंदर्भात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते, जे 15 नोव्हेंबर 2018 साली 15 आरोपींच्या विरोधात होते.

कोरेगाव भीमा एल्गार परिषद न्यूज
कोरेगाव भीमा एल्गार परिषद न्यूज
author img

By

Published : Oct 9, 2020, 7:37 PM IST

मुंबई - कोरेगाव भीमा एल्गार परिषदप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून विशेष न्यायालयामध्ये 10 हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपींच्या विरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून यात कलम 120b , 115 , 121, 121a , 124a , 153a , 201 , 505 (1)(b) आणि 34 भारतीय दंड विधानाच्या 13, 16, 17, 18,18a, 18b, 38, 39, 40 या कलमानुसार आरोप ठेवले आहेत.

आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा, हॅनी बाबू , सागर गोरखे, रमेश गायचोर, ज्योती जगताप, स्टेन स्वामी व मिलिंद तेलतुंबडे या आरोपींवर एनआयएकडून हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा एल्गार परिषद प्रकरणी पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यातील शनिवारवाडा येथे कबीर कला मंचकडून कार्यक्रम करण्यात आला होता. या वेळेस वेगवेगळ्या व्यक्तींकडून प्रक्षोभक भाषणे करण्यात आली होती. त्याची परिणती दुसऱ्या दिवशी दंगलीत झाली होती. या अगोदर पुणे पोलिसांकडून यासंदर्भात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते, जे 15 नोव्हेंबर 2018 साली 15 आरोपींच्या विरोधात होते.

काय म्हटले आहे आरोप पत्रात?

  • आनंद तेलतुंबडे इतर वेळेस गोव्यात राहत असतात. मात्र, 31 डिसेंबर 2017च्या दिवशी शनिवारवाडा येथील एल्गार परिषदेमध्ये ते हजर होते, असा आरोप राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्यांच्या आरोपपत्रात केला आहे. तेलतुंबडे यांना माओवाद्यांकडून पैसे मिळत होते आणि पैशाचा वापर ते इतर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी वापरत असल्याचा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने केला आहे.
  • गौतम नवलखा हे माओवाद्यांशी संपर्कात होते. त्याबरोबरच सरकारच्या विरोधात बुद्धिजीवींना एकत्र करण्याचं काम ते करत असल्याचा आरोप राष्ट्रीय तपास यंत्रणेने केला आहे.
  • दिल्ली विद्यापीठात सहायक प्राध्यापक असणारे हॅनी बाबू हे परदेशी पत्रकारांना माओवाद्यांच्या परिसरात नेऊन भेट घडवून देण्यासाठी काम करत होते. हॅनी बाबू हे मणिपूरमधील बंदी घालण्यात आलेल्या कांगलीपक कम्युनिस्ट पार्टीच्या संपर्कात होते.
  • सागर बोडके, रमेश गायचोर, ज्योती जगताप हे माओवाद्यांकडून ट्रेनिंग घेतलेले प्रतिनिधी असून कबीर कला मंचचे सदस्य सुद्धा यात आहेत. एल्गार परिषदेच्या संदर्भात त्यांनी इतर आरोपींसोबत बैठक घेतली होती व त्यासाठी त्यांनी कट रचल्याचा आरोप राष्ट्रीय तपास यंत्रणेने केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.