मुंबई - देशद्रोही याकूब मेनन यांच्या कबरीवर कोरोना काळात सौंदर्यीकरण Yakub grave decoration issue झाले. त्यावेळी असलेल्या तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोणालाही भेटण्यासाठी वेळ नव्हता. अशावेळी याकूब मेनन याच्या कबरीचे सुशोभीकरणला अलिखित परवागनगी देण्यात आली. आता त्याचा निषेध राज्यभर होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व त्यांनी किती ऍडजस्ट केले, हे यातुन स्पष्ट Chandrasekhar Bawankule Criticized Shiv Sena होते.
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या कृत्याचा भाजप निषेध करत असल्याचे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. आज प्रदेश कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेत, त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर याकूब मेमन याच्या कबरीच्या सजवटीवरून आरोप केले.
ठाकरेंनी मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी अनेक अयोग्य घटनांचे समर्थन केले कोरोना काळात कबरीचे सुशोभीकरण होत असताना पोलिसांनी त्यावेळच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना याबाबत नक्कीच माहिती दिली असणार. म्हणून या घटनेला महविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. उद्धव ठाकरे म्हणतात, आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व सोडणार नाही. मग त्यांनी हे का केलं? यासाठी उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या जनतेची माफी मागावी. मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी अनेक घटनांचे समर्थन केले, असे कबूल केलं पाहिजे अशी मागणी ही बावनकुळे BJP State President Chandrasekhar Bawankule यांनी केली.
आरोपींवर कडक कारवाई झाली पाहिजे याकूब मेमन हा देशद्रोही होता. त्यामुळे ज्यांनी याकूब मेमन याची कबर सजवली. त्यांच्यावर देशद्रोहचा गुन्हा दाखल करत, कडक कारवाई करावी केली Chandrasekhar Bawankule on Yakub grave decoration पाहिजे. तसेच कबरीवर केलेले सुशोभीकरण तातडीने काढून टाकण्यात यावे. अशी मागणी त्यांनी राज्यात असलेल्या भाजप सरकारला केली आहे. मविआमधील कोणत्या नेत्यांनी या शुशोभीकरणाचे समर्थन केले त्यांना तातडीने शोधून काढावे. हे गंभीर प्रकरण आहे. याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये लक्ष घालत कारवाईचे आदेश दिले, असल्याची माहिती ही बावनकुळे यांनी यावेळी दिली. Chandrasekhar Bawankule Criticized Shiv Sena over Yakub grave decoration issue