ETV Bharat / city

Nana Patoles Controversy Statement : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पंतप्रधानांना धमकी दिलेली भाजपा सहन करणार नाही-चंद्रकांत पाटील - चंद्रकांत पाटील महाविकास आघाडी टीका

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा ‘मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो’ अशी पंतप्रधानांना धमकी देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला ( Nana Patole viral video ) आहे. त्या संदर्भात चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, की काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole controversy statement on PM ) यांनी पंतप्रधानांना दिलेल्या धमकीबाबत आक्रमक उत्तर द्यावे, अशी सूचना आपण सर्व जिल्हाध्यक्षांना केली आहे.

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Jan 17, 2022, 8:57 PM IST

मुंबई - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून मारण्याची व शिव्या देण्याची धमकी दिली आहे. हा प्रकार भारतीय जनता पक्ष सहन करणार नाही. भाजपचे कार्यकर्ते सर्व जिल्ह्यांत पटोले यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करणार आहेत. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही तर भाजप न्यायालयात जाईल, असा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil warning to Nana Patole ) यांनी दिला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा ‘मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो’ अशी पंतप्रधानांना धमकी देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला ( Nana Patole viral video ) आहे. त्या संदर्भात प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, की काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole controversy statement on PM ) यांनी पंतप्रधानांना दिलेल्या धमकीबाबत आक्रमक उत्तर द्यावे, अशी सूचना आपण सर्व जिल्हाध्यक्षांना केली आहे.

हेही वाचा-OBC Reservation : सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणावरील सुनावणी होणार बुधवारी; मतदान मात्र होणार मंगळवारी

...तर आम्ही न्यायालयात जाऊ.

पंजाबमध्ये पंतप्रधानांचा ताफा अडवून त्यांना जिवे मारण्यासाठी घातपाताचा प्रयत्न झाला. त्याला नाना पटोले नौटंकी म्हणाले होते. त्याच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. यावेळीही पोलिसांनी तसेच केले तर आम्ही न्यायालयात जाऊ.

हेही वाचा-Bully Bai App Case : तिनही आरोपीच्या जामीन अर्जावर मंगळवारी होणार पुन्हा सुनावणी

सत्तेच्या हव्यासातून कारवाई टाळली जात आहे-
काँग्रेसचे प्रदेशाध्याक्ष पाटील म्हणाले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जर तर अशा स्वरुपात एक वक्तव्य केले होते. तरी राज्यातील पोलिसांनी कारवाई केली. पण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पंतप्रधानांबाबत तसे बोलतात. केंद्रीय गृहमंत्र्यांवर पंतप्रधानांच्या विरोधातील कारस्थानामागे हात असल्याचा आरोप करतात. तरीही पोलीस कारवाई करत नाहीत. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर कारवाई केली तर काँग्रेस पाठिंबा काढून घेईल. सरकार कोसळेल. यामुळे सत्तेच्या हव्यासातून कारवाई टाळली जात ( Chandrakant Patil slammed Mahavikas Aghadi ) आहे. पण, भाजपा हे सहन करणार नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी म्हटले.

हेही वाचा-Fake Playboy Job : प्लेबॉय म्हणून काम देण्याचे आमिष दाखवून दीड लाखांची फसवणूक; आरोपीला दिल्लीतून अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.