ETV Bharat / city

Chandrakant Patil On Govt Proposal : सरकारने चांगला प्रस्ताव ठेवल्यास एसटी कर्मचारी स्वीकारतील - चंद्रकांत पाटील

author img

By

Published : Mar 22, 2022, 6:57 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलन असेच सुरू राहिल्यास त्याचा परिणाम एसटी कर्मचाऱ्यांच्या 1 लाख कुटुंबावर होईल. तसेच एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे ग्रामीण भागात जनतेचे हाल होत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने याबाबत सकारात्मकता दाखवत लवकरात लवकर उपाय काढणे गरजेचे असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले ( Chandrakant Patil On Govt Proposal ) आहेत.

Chandrakant Patil About ST Employees Agitation
चंद्रकांत पाटील

मुंबई - गेल्या चार महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र अद्यापही या आंदोलनावर राज्य सरकार तोडगा काढू शकलेला नाही. एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलन असेच सुरू राहिल्यास त्याचा परिणाम एसटी कर्मचाऱ्यांच्या 1 लाख कुटुंबावर होईल. तसेच एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे ग्रामीण भागात जनतेचे हाल होत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने याबाबत सकारात्मकता दाखवत लवकरात लवकर उपाय काढणे गरजेचे असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले ( Chandrakant Patil On Govt Proposal ) आहेत. तसेच कर्मचारी एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर आग्रही असले तरी, राज्य सरकारने पगारवाढीचा योग्य तो प्रस्ताव नेल्यास कर्मचारी दोन पावले मागे येऊन पर्याय निघेल असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी ( Chandrakant Patil About ST Employees Agitation ) व्यक्त केला.

शिवसेनेला सर्व सोडायला लागेल -

कोल्हापूरमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीत शिवसेनेला काँग्रेससाठी जागा सोडावी लागेल. त्या जागेवर पाच वेळा शिवसेनेचा आमदार निवडून आला होता. मात्र आता शिवसेनेला ही जागा काँग्रेससाठी सोडावी लागल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. तसेच पुढे लोकसभेला मावळ मतदार संघ देखील पार्थ पवार साठी सोडावा लागेल अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

हेही वाचा - उद्धव ठाकरेंच्या मेहुण्यावर ईडीची कारवाई.. ६ कोटींची मालमत्ता जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.