ETV Bharat / city

Chandrakant Patil on Wine Sale Decision : वाईन विक्रीसंदर्भातला निर्णय सरकारला मागे घ्यावाच लागेल - चंद्रकांत पाटील - चंद्रकांत पाटील महाविकास आघाडीवर टीका

राज्य सरकारने वाईन आता सर्व किराणा आणि सुपरमार्केटमध्ये मिळणार (Wine Sales at Supermarket) या संदर्भात निर्णय घेतला होता. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी हा निर्णय सरकारला कुठल्याही परिस्थितीत  मागे घ्यावाच लागेल, असे वक्तव्य केले आहे.

Chandrakant Patil
चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Feb 2, 2022, 5:15 PM IST

Updated : Feb 2, 2022, 6:21 PM IST

मुंबई - मागच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सरकारने वाईन आता सर्व किराणा आणि सुपरमार्केटमध्ये मिळणार (Wine Sales at Supermarket) या संदर्भात निर्णय घेतला होता. त्यावरून आता राजकारण सुरू झाले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Wine Sale Decision) यांनी या संदर्भामध्ये भाष्य करून यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्याचाच उल्लेख करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी हा निर्णय सरकारला कुठल्याही परिस्थितीत मागे घ्यावाच लागेल, असे वक्तव्य केले आहे. भाजप प्रदेश कार्यालयात ते बोलत होते.

प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
  • महाविकास आघाडी सरकारची जबरदस्ती-

सुपरमार्केट व किराणा दुकानांमध्ये आता वाईन उपलब्ध करून देण्याचा सरकारचा निर्णय त्यांच्याच अंगलट येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारला हा निर्णय परत घ्यावा लागेल असे वक्तव्य केले आहे. पाटील म्हणाले की, सरकार प्रत्येक गोष्ट त्यांच्या पद्धतीने जोर लावून वटवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु तसं होताना दिसत नाही. केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील अबकारी कर परत घेतला, त्यासोबत इतर राज्यांनीही हा कर परत घेतला. परंतु महाराष्ट्र हा कर परत घ्यायला तयार नाही. त्याचबरोबर दारू या विषयावर गावागावात महिला आंदोलन करून रस्त्यावर उतरतील व वाईन संदर्भामध्ये जो निर्णय घेतलेला आहे तो सरकारला परत घ्यावाच लागेल.

  • मागील दोन वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केले?

वाईन शॉपचे नाव बदलून त्याऐवजी आता अमृत शॉप, दूध शॉप, सोडा शॉप अशा पद्धतीचे नाव द्या. शेतकऱ्यांना मदत म्हणून तुम्ही हा निर्णय घेत असला तरी शेतकऱ्यांसाठी मागील दोन वर्षात तुम्ही काय केलं? असा प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

  • काय म्हणाले होते शरद पवार?

महाविकास आघाडी सरकारने वाईनसंदर्भात घेतलेल्या निर्णयावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. वाईन तसेच इतर मद्यामधील फरक समजून घेण्याची भूमिका घेतली पाहिजे. ती घेतली नाही आणि त्याला विरोध असेल तर सरकारने या सगळ्या गोष्टींसंदर्भात वेगळा विचार केला तरी माझा विरोध असण्याचे कारण नाही. हा चिंताजनक विषय आहे असे वाटत नाही, पण काहीजणांना वाटत असेल तर त्यासंबंधी राज्य सरकारने वेगळा दृष्टिकोन स्वीकारला तर त्याच्यात फारसे वावगे होणार नाही, असे मत शरद पवार यांनी या संदर्भामध्ये व्यक्त केले आहे.

  • काँग्रेसला आता कामधंदा नाही -

आज मुंबई युवक काँग्रेसतर्फे भाजप मुंबई प्रदेश कार्यालयाबाहेर पेगॅसेस प्रकरणावरून आंदोलन करण्यात आले. मोठ्या प्रमाणामध्ये भाजप कार्यकर्ते व काँग्रेस कार्यकर्ते हे एकमेकांबरोबर यादरम्यान भिडले. याविषयी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, काँग्रेसला आता काही कामधंदा उरला नाही, जे विषय संपलेले आहेत ते पुन्हा उकरून काढायचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. जे करायचे असेल ते करा भाजप त्याला व्यवस्थित उत्तर देईल. त्याचबरोबर भाजपचे कार्यकर्ते बौद्धिक व शारीरिक दृष्ट्या सक्षम आहेत, असेही त्यांनी सांगितले आहे.

Last Updated : Feb 2, 2022, 6:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.