ETV Bharat / city

Chandrakant Patil Criticize Mahavikas Aghadi : उधारीचा वायदा अन् जबाबदारी टाळणारा अर्थसंकल्प - चंद्रकांत पाटील - Chandrakant Patil on assembly budget 2022

राज्याचा अर्थसंकल्प अजित पवारांनी विधानसभेत सादर केला ( Assembly Budget 2022 ) आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी महत्वाच्या विषयांत जबाबदारी टाळून दिशाभूल करणारा अर्थसंकल्प आहे, अशी टीका केली ( Chandrakant Patil Criticize Mahavikas Aghadi ) आहे.

Chandrakant Patil
चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Mar 11, 2022, 7:43 PM IST

मुंबई - महाविकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प आज सादर ( Assembly Budget 2022 ) झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थंसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात विकासाची पंचसूत्री मांडली आहे. त्यावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मांडलेला अर्थसंकल्प हा वायदा करणार आणि महत्वाच्या विषयांत जबाबदारी टाळून दिशाभूल करणारा आहे, अशी टीका पाटील यांनी महाविकास आघाडीवर केली ( Chandrakant Patil Criticize Mahavikas Aghadi ) आहे.

शेतकऱ्यांच्या निधीबाबत जबाबदारी का पार पाडली नाही

प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५०,००० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याची घोषणा यापूर्वीच्या अर्थसंकल्पात केली होती. पण त्याची अंमलबजावणी केलीच नाही, याची कबुली अर्थमंत्र्यांनी दिली आणि आता आगामी वर्षात वचनपूर्ती करण्याचे आश्वासन दिले आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था रुळावर आली आणि विकासाचा वेग वाढला म्हणून कालच आर्थिक पाहणी सादर करताना दावा करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना द्यायच्या निधीबाबत जबाबदारी का पार पाडली नाही. आता उधारीचा वायदा का केला हे सांगितले पाहिजे.

सरकारने दिशाभूल केली

एसटी ही ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे, हे अर्थमंत्री कबूल करतात. पण संपामुळे बंद पडलेली एसटीची चाके पुन्हा सुरू करण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्याच्या ऐवजी केवळ नव्या बसेससाठी घोषणा करून या सरकारने दिशाभूल केली आहे. त्याचप्रमाणे पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करून सामान्य माणसाला दिलासा देण्याची जबाबदारीही अर्थसंकल्पात टाळली आहे, असा निशाणा पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर साधला आहे.

हेही वाचा - Devendra Fadnavis Criticize Mahavikas Aghadi : सरकारने अर्थसंकल्पात सर्व घटकांच्या तोंडाला पाने पुसली - फडणवीसांची टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.