ETV Bharat / city

चंद्रकांत पाटलांची जीभ घसरली; म्हणाले, तुम्ही घरी जा अन् स्वयंपाक करा - Chandrakant Patil Criticise Supriya Sule

चंद्रकांत पाटलांची जीभ घसरली आहे. त्यांनी सुप्रिया सुळेंवर अत्यंत शेलक्या भाषेत टीका केली आहे. "तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा. खासदार असून तुम्हाला कळत नाही. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या", अशी टीका त्यांनी केली आहे. 'मध्यप्रदेशच्या सरकारने दोन दिवसांमध्ये दिल्लीत असं काय केलं ज्यामुळे मध्य प्रदेशात आरक्षण मिळालं', असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यावरून चंद्रकांत पाटलांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

चंद्रकांत पाटीलvसुप्रिया सुळे
चंद्रकांत पाटीलvसुप्रिया सुळे
author img

By

Published : May 26, 2022, 1:13 PM IST

Updated : May 26, 2022, 1:33 PM IST

मुंबई: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना भाजप प्रदेशाध्य चंद्रकांत पाटलांची जीभ घसरली आहे. सुप्रिया सुळेंवर पाटलांनी अत्यंत शेलक्या भाषेत टीका केली आहे. "तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा. खासदार असून तुम्हाला कळत नाही. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या", असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

यशोमती ठाकूर यांचे ट्विट
यशोमती ठाकूर यांचे ट्विट

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या राज्यातील तापमान चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरक्षणावरून टीकेची झोड एकमेकांवर उठवली जात आहे. आज भाजपने आक्रमक पवित्रा घेत मंत्रालयावर मोर्चा काढला. यावेळी भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी यात सहभाग घेतला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनीही यात सहभाग घेत सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. तसेच, त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर वैयक्तिक टीका केलीये.

कशाला राजकारणात राहाता, घरी जा, स्वयंकाप करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही मुख्यमंत्र्याची भेट कशी घ्यायची. कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायचे, आता घरी जाण्याची वेळ झालीये. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या", असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळेंवर घणाघाती टीका केली आहे. त्यावर आता सुप्रिया सुळे यांनी उत्तर देत चंद्रकांत पाटलांच्या बोलण्याचा इतका विचार करत नाही अस त्या म्हटल्या आहेत.

हेही वाचा - नरेंद्र मोदी सरकारच्या 8 वर्षात सर्वसामान्यांना काय मिळाले?

Last Updated : May 26, 2022, 1:33 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.