ETV Bharat / city

Maharashtra Rain : तब्बल १९ जिल्ह्यांना येलो अलर्ट, अर्ध्यांधिक महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज - Alert in 13 districts

राज्यात पुढील पाच दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची (Rain in maharashtra) शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस हवामान खात्याने जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान खात्याने मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, बीड, लातूर, नांदेड, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह 19 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.

Chance of heavy rains in the next five days
राज्यात जोरदार पावसाची शक्यता
author img

By

Published : Nov 17, 2021, 7:09 PM IST

Updated : Nov 19, 2021, 6:48 PM IST

मुंबई - अरबी समुद्रात (Arabian Sea) कमी दाबाचा पट्टा (Low Pressure Area) निर्माण झाला आहे, असे प्रादेशिक हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने आज (शुक्रवार) मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, बीड, लातूर, नांदेड, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह 19 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.

  • 19 Nov; राज्यात पुढच्या 4 दिवसांत (19-22 Nov) मेघगर्जनेसह पावसाची 🌧🌩शक्यता. वारे पण जोरदार असण्याची शक्यता. कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच संलग्न मराठवाडा भाग प्रभावित.
    3 व 4 दिवशी प्रभाव कमी होण्याची शक्यता. विजा चमकताना बाहेर पडू नका,
    - IMD@RMC_Mumbai pic.twitter.com/lgP1sImYr0

    — K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 19, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • १९ जिल्ह्यांना येलो अलर्ट -

हवामान खात्याकडून महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 19 नोव्हेंबरनंतर याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील तीन दिवस काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वातावरणात बदल झाला आहे. हवामान खात्याने आज मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, बीड, लातूर, नांदेड, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह 19 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन ते चार तासांत याठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे.

  • 'या' पाच राज्यात पाऊस -

मुंबईदेखील दुपारपासून वातावरणात बदल जाणवत होता. काही भागांमध्ये ढगाळ वातावरण तयार झाले असून काही ठिकाणी तुरळक सरी देखील कोसळल्या आहेत. गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि मध्यप्रदेशमध्ये पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे.

  • हवामान तज्ञ कृष्णानंद होसाळीकर म्हणाले -

अरबी समुद्रात निर्माण कमी दाबाचे क्षेत्र व संबंधित सिस्टिम मधून कोकण किनारपट्टीमध्ये द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी किनारपट्टी व आतल्या भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे पुढील 48 तासात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र किनारपट्टीच्या बाहेरील भागात सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्याचे हवामान तज्ञ कृष्णानंद होसाळीकर (Meteorologist Krishnananda Hosalikar) यांनी सांगितले.

हेही वाचा - Rain for the next A few days - पुढील काही दिवस राज्यात पाऊस, हवामान विभागाची माहित

Last Updated : Nov 19, 2021, 6:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.