ETV Bharat / city

Best Chalo Mobile App Smart Card: मुंबईत बेस्टच्या प्रवाशांची सुट्या पैशांची समस्या सुटणार, मोबाईल ॲप आणि स्मार्ट कार्ड सुरु

author img

By

Published : Jan 1, 2022, 3:51 PM IST

मुंबईत बेस्ट बसने ( Mumbai Best Bus Travel ) प्रवास करणाऱ्यांची सुट्या पैशांची समस्या आता स्मार्ट कार्डमुळे ( Best Bus Smart Card Mumbai ) सुटणार आहे. तसेच चलो मोबाईल ॲपद्वारे ( Chalo Mobile App Mumbai ) प्रवाशांना बसचे ठिकाण आणि येण्यासाठी लागणारा वेळही कळणार असल्याने प्रवाशांचा फायदा होणार आहे. आजपासून ही स्मार्ट कार्ड आणि मोबाईल ॲपची सुविधा सुरु करण्यात आली आहे.

बेस्ट बस
बेस्ट बस

मुंबई - बेस्ट उपक्रमाने ( Best Undertakings ) मुंबईकरांना आधुनिक सुविधा असलेले चलो मोबाइल ॲप ( Chalo Mobile App Mumbai ) आणि स्मार्ट कार्ड सेवेत ( Best Bus Smart Card Mumbai ) आणले आहे. चलो मोबाइल ॲपमुळे प्रवाशांना नेमकी बस किती वाजता येणार आहे, हे समजणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. तसेच स्मार्ट कार्डमुळे सुट्ट्या पैशांची समस्या सुटणार असून, प्रवाशांना ७२ प्लॅन्सचा वापर करून प्रवास ( Mumbai Best Bus Travel ) करता येणार आहे. या कार्डचे पर्यावरण मंत्री मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे ( Minister Aaditya Thackeray ) यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण झाले होते. आज नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रवाशांना हे कार्ड उपल्बध करून देण्यात आले आहे.

प्रवाशांचा त्रास कमी होणार

बेस्ट उपक्रमाने प्रवाशांसाठी सेवेत आणलेल्या ‘चलो मोबाइल ॲप’ च्या साहाय्याने बेस्ट प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे. तसेच बस थांब्यावर बससाठी थांबण्याचा वेळही वाचणार आहे. प्रवासासाठी तिकीट काढताना सुट्ट्या पैशांवरुन होणारे वाद टाळण्यासाठी स्मार्ट कार्ड सेवाही अंतर्भूत केली आहे. त्यावर तिकीटासह पास काढण्याची व्यवस्था पुरविली जाणार आहे. बेस्टच्या प्रवाशांना आतापर्यंत पाससाठी बेस्टच्या बस आगार, स्थानकाकडे फेऱ्या माराव्या लागतात. बेस्टमध्ये दैनंदिन प्रवासातही कंडक्टरकडून तिकिट घ्यावे लागते. सध्या बेस्टच्या दैनंदिन प्रवाशांची संख्या २५ ते २६ लाख एवढी आहे. मात्र, त्यांना ऑनलाइन वा ॲपवरुन तिकीट वा पास घेण्याची सुविधा नव्हती. त्याचा परिणाम म्हणून गर्दीच्या वेळी बसमध्ये प्रवाशांना तिकीट देण्यासाठी कंडक्टरना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यात, अनेकदा सुट्ट्या पैशांवरुनही कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये वाद होतात. या सर्वांवर उपाय म्हणून बेस्टने नवीन मोबाइल तिकीट ॲप सेवा ( Mobile Ticket App By Best Bus ) सुरू केली आहे. त्यात तिकीट, पास मिळविण्यासाठी प्रवाशांना मोबाइल ॲप डाऊनलोड करावे लागेल. यामुळे घरबसल्याही तिकीट काढता येईल. या ॲपवर एका प्रवासाचे तिकीट वा मासिक पास घेता येऊ शकणार आहे.

प्रवाशांसाठी ७२ नवीन प्लॅन

प्रवाशांना त्यांच्या नियमित प्रवासी भाड्यासह, प्रवासाच्या ठिकाणाच्या दृष्टीने ठराविक अंतराच्या अनुषंगाने बस पासची निवड करता येऊ शकेल. त्यात, एका दिवसांपासून ते ८४ दिवसांपर्यंत आणि दोन फेऱ्यांपासून १५० फेऱ्यांचा पर्याय असणार आहे. आजपासून बेस्टच्या स्मार्ट कार्डची सेवा प्रत्यक्ष उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कार्डाच्या आधारे पास, तिकिटही काढता येणार आहे. या कार्डमध्ये दहा रुपये पासून ते तीन हजार रुपयांपर्यंत कितीही रक्कम रिचार्ज ( Best Bus Smart Card Recharge ) करता येणार असल्याचे बेस्टने स्पष्ट केले आहे. हे कार्ड बेस्ट डेपो आणि कंडक्टरकडे उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे कार्ड ७० रुपयांचे असून त्यामध्ये प्रवाशांना हवे तसे प्लॅन्स ऍक्टिव्ह करता येणार आहेत.

बसचे नेमके ठिकाण समजणार

बेस्ट थांब्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांना बसची तासंतास वाट बघावी लागते. यामुळे अनेकवेळा प्रवासी रिक्षा, टॅक्सी, ओला, उबेर अशा खासगी वाहनांचा आधार घेत प्रवास करत होते. आता बेस्टकडून ॲप सुरु करण्यात आले आहे. त्याद्वारे बस किती वेळात येईल, बस नेमकी कुठे आहे आदी माहिती ॲपमध्ये दिसेल. त्याचप्रमाणे बसमध्ये किती गर्दी आहे, बसण्यासाठी किती जागा शिल्लक आहेत आदी माहिती समजणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.