ETV Bharat / city

Mashal symbol : शिवसेनेच्या मशाल चिन्हावर भुजबळ झाले होते पहिले आमदार, वाचा सविस्तर - छगन भुजबळ शिवसेनेचे पाहिले आमदार

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या तत्कालीन ‘मशाल’ चिन्हाशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. छगन भुजबळ यांनी मशाल चिन्हावर माझगाव मतदार संघातून निवडणूक लढवत शिवसेनेचे पहिले आमदार म्हणून विजय मिळवला ( Chhagan Bhujbal Shiv Sena first MLA elected on Mashal symbol ) होता.

Chhagan Bhujbal Shiv Sena
छगन भुजबळ यांनी मशाल चिन्हावर माझगाव मतदार संघातून निवडणूक लढवत शिवसेनेचे पहिले आमदार म्हणून विजय मिळवला होता.
author img

By

Published : Oct 11, 2022, 1:14 PM IST

Updated : Oct 11, 2022, 3:02 PM IST

नाशिक : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षावरील दाव्याच्या वादामुळे निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले आहे. निवडणूक आयोगाने ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे पक्षाचे नाव मान्य करत ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह दिले.याच पार्श्‍वभूमीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या तत्कालीन ‘मशाल’ चिन्हाशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत ( छगन भुजबळ यांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवत शिवसेनेचे पहिले आमदार म्हणून विजय मिळवला ( Chhagan Bhujbal Shiv Sena first MLA elected on Mashal symbol ) होता.

Chhagan Bhujbal Shiv Sena
निवडणूक आयोगाने ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे पक्षाचे नाव मान्य करत ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह दिले आहे.

मशाल चिन्हावर लढवली निवडणूक - तत्कालीन शिवसेनेचे पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 2 मार्च 1985 साली छगन भुजबळ यांनी माझगाव मतदार संघातून मशाल चिन्हावर निवडणूक लढवत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. यावेळी त्यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते.

Chhagan Bhujbal Shiv Sena
छगन भुजबळ यांनी मशाल चिन्हावर माझगाव मतदार संघातून निवडणूक लढवत शिवसेनेचे पहिले आमदार म्हणून विजय मिळवला होता.

शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश - छगन भुजबळ कॉलेज जीवनात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने ते प्रेरित झाले होते, याच काळात भुजबळ यांची राजकीय कारकीर्द शिवसेनेतून सुरू झाली. छगन भुजबळ 1972-73 मध्ये पहिल्यांदा नगरसेवक झाले होते आणि 1973 ते 1974 या काळात ते मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेते होते. पुढे, 1991 मध्ये त्यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मतभेद झाले आणि शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला.नोव्हेंबर 1991 मध्ये महसूलमंत्री,तर गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा या खात्याचे 1995 पर्यंत मंत्री होते.अशात त्यांनी 1 नोव्हेंबर 1992 मध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना केली,एप्रिल 1996 मध्ये विधान परिषदेत विरोधी पक्षनेते झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश - काँग्रेसच्या विभाजनानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भुजबळ यांनी 18 ऑक्टोबर 1999 ला उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यासोबतच त्यांनी गृह आणि पर्यटन खात्याची जबाबदारी सांभाळली.एप्रिल-2002 मध्ये त्यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली. पुढे ते एप्रिल 2002 ते 23 डिसेंबर 2003 या कालावधीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. 2004 ते 2008 या कालावधीत येवला मतदारसंघातून निवडून येत ते सार्वजनिक बांधकाममंत्री होते. 8 डिसेंबर 2008 ला महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर राष्ट्रवादी कॉग्रेस आणि कॉग्रेस आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री पदाची जबाबदारी होती,तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री राहिले.

Last Updated : Oct 11, 2022, 3:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.