ETV Bharat / city

Booster Dose: करोना प्रतिबंधक लशीची वर्धक मात्रा मोफत देण्याचा केंद्राचा निर्णय - उद्यापासून मुंबईत बुस्टर डोसला सुरूवात

मुंबईमधील ९२ लाख ३६ हजार ५०० नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ठ देण्यात आले होते. त्यापैकी गेल्या दीड वर्षात मुंबई महानगरपालिकेने लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसचे उद्दिष्ट पार केले आहे. मात्र ९ लाख ९२ हजार १७७ लाभार्थ्यांना बूस्टर डोस देता आला आहे. ( Booster dose ) यामुळे येत्या ७५ दिवसात मुंबईमधील ८२ लाख ४४ हजार ३२३ नागरिकांनी बूस्टर डोस देण्याचे आव्हान पालिकेसमोर असणार आहे.

करोना प्रतिबंधक लस
करोना प्रतिबंधक लस
author img

By

Published : Jul 14, 2022, 6:33 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये मार्च २०२० पासून कोरोना विषाणूचा प्रसार सुरु झाला. हा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहीम राबवण्यात आली. मुंबईमधील ९२ लाख ३६ हजार ५०० नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ठ देण्यात आले होते. त्यापैकी गेल्या दीड वर्षात मुंबई महानगरपालिकेने लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसचे उद्दिष्ट पार केले आहे. मात्र ९ लाख ९२ हजार १७७ लाभार्थ्यांना बूस्टर डोस देता आला आहे. ( Corona vaccine ) यामुळे येत्या ७५ दिवसात मुंबईमधील ८२ लाख ४४ हजार ३२३ नागरिकांनी बूस्टर डोस देण्याचे आव्हान पालिकेसमोर असणार आहे. यावर केंद्र सरकारची गाईडलाईन आल्यावर बूस्टर डोस दिले जातील असे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

मुंबईत असे झालेय लसीकरण - मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा प्रसार सुरु झाला आहे. हा प्रसार रोखण्यासाठी देशभरात १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहीम सुरु झालाय आहे. ( Provide Free Dose Of Corona Vaccine ) या मोहिमेंतर्गत आतापर्यंत १ कोटी ८ लाख ३० हजार ८६५ लाभार्थ्यांना लसीचा पहिला, ९७ लाख २४ हजार ७०५ लाभार्थ्यांना लसीचे दोन्ही तर ९ लाख ९२ हजार १७७ लाभार्थ्यांना बूस्टर डोस देण्यात आले आहेत. १२ ते १४ वयोगटातील १ लाख ५८ हजार ३७४ मुलांना पहिला तर ८२ हजार ४९४ मुलांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. १५ ते १७ वयोगटातील ३ लाख ९५ हजार ३०२ मुलांना लसीचा पहिला तर २ लाख ९७ हजार ३२६ मुलांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

पालिका उद्दिष्ठापासून लांबच - मुंबई महानगरात १८ वर्षांवरील नागरिकांचा विचार करता, एकूण ९२ लाख ३६ हजार ५०० मुंबईकरांना दोन्ही लसी देवून लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. इतक्याच मुंबईकरांना बूस्टर डोस द्यावा लागणार आहे. महापालिकेने आतापर्यंत ९ लाख ९२ हजार १७७ लाभार्थ्यांना बूस्टर डोस देता आला आहे. मुंबईमधील ८२ लाख ४४ हजार ३२३ नागरिकांनी अद्याप बूस्टर डोस घेतलेला नाही. बूस्टर डोस वयोवृद्ध, हेल्थ वर्कर आणि फ्रंट लाईन यांनाच मोफत दिला जात होता. इतरांना बूस्टर डोस विकत घ्यावा लागत होता. आता केंद्र सरकारने ७५ दिवस बूस्टर डोस मोफत देण्याची घोषणा केली आहे. यामुळे उर्वरित ८२ लाख ४४ हजार ३२३ नागरिकांना बूस्टर डोस देण्याचे आवाहन पालिकेसमोर आहे.

गाईडलाईन आल्यावर बूस्टर डोस - मुंबईमध्ये सध्या खासगी रुग्णालयांमध्ये बूस्टर डोस दिला जात आहे. पालिका आणि सरकारी रुग्णालये आणि केंद्रांमध्ये बूस्टर डोस देण्यासाठी कोवीन ऍपमध्ये बदल होणे अपेक्षित आहे. तसेच, केंद्र सरकारने १५ जुलैपासून १८ वर्षावरील नागरिकांना बूस्टर डोस देण्याची घोषणा केली असली तरी त्याचे गाईडलाईन आलेले नाहीत. गाईडलाईन आल्यावर त्यानुसार बूस्टर डोस दिला जाईल. पालिकेकडे सध्या लसीचा साठा आहे यामुळे लसीकरण करण्यात कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी आपले नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर दिली आहे.

एकही दिवस वाया नको - मुख्यमंत्री - शुक्रवारपासून पुढील ७५ दिवस देशातील सर्व प्रौढ व्यक्तींना कोविडचा बूस्टर डोस (वर्धक मात्रा) मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून या मोहिमेची पुरेपूर अंमलबजावणी महाराष्ट्रात केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे. या मोहिमेमध्ये एकही दिवस वाया घालू न देता सर्व संबंधितांना बूस्टर मात्रा मिळालीच पाहिजे यासाठी राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, आरोग्य संस्था यांना देखील सहभागी करून घ्यावे. याविषयी पुरेशी जन जागृती करावी असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

काय केलीय केंद्र सरकारने घोषणा - भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (७५ वर्ष) साजरा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने १५ जुलै पासून पुढील ७५ दिवस १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना बूस्टर डोस मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे.

हेही वाचा - आधी पन्हाळा आणि आता विशाळगडाचा बुरुज ढासळला; दुर्गसंवर्धन मोहिम कागदावरच!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.